राजकारण

ढाणकी नगरपंचायत नगराध्यक्षापदी अर्चना सूर्यकांत वासमावर (मशाल चिन्ह)

ढाणकी नगरपंचायत नगराध्यक्षापदी अर्चना सूर्यकांत वासमावर (मशाल चिन्ह)

ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकटे

ढाणकी नगर पंचयातचा कोण होणार नगराध्यक्ष या बाबतची तब्बल १८ दिवस ताणलेली प्रतीक्षा संपली आहे.रविवारी मतमोजणी झाली असून नागरिकांचे लक्ष लागलेल्या निकाल समोर आला आहे. प्रमुख लढत झालेल्या महिला नगराध्यक्षपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अर्चना सूर्यकांता वासमावर विजयी झाले आहे.

ढाणकी नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूकीत नगरसेवक म्हणून भाजपचे एकूण सात नगरसेवक, शिव सेना शिंदे गट तीन नगरसेवक, एम आय एम तीन नगरसेवक, काँग्रेस दोन नगरसेवक व दोन अपक्ष नगरसेवक निवडून आले. या निवडणुकीत काँग्रेस, भाजप व शिव सेना यांनी विभक्त राहून एक नगर अध्यक्ष व सतरा नगरसेवक तर शिव सेना शिंदे गट यांनी एक नगरअध्यक्ष व सोळा नगरसेवक जागा लढवल्या.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *