ताज्या घडामोडी

उमरखेड / प्रा .डॉ .अनिल काळबांडे यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार जाहीर.

उमरखेड / प्रा .डॉ .अनिल काळबांडे यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार जाहीर.

उमरखेड तालुका प्रतिनिधी मिलिंद ची काटे.

उमरखेड – दि .९ मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा २०२५ चा आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण राज्यस्तरीय पुरस्कार दैनिक सकाळचे उमरखेड बातमीदार तथा प्रख्यात विचारवंत प्रा . डॉ . अनिल काळबांडे यांना त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक पत्रकारीता कार्याबद्ल महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी यांच्या वतीने जाहिर करण्यात आला . हा पुरस्कार एका खास संभारंभात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्म गावी पोंभुर्ले ता . देवगड जि . सिधुदुर्ग येथे मान्यवरांच्या उपस्थितीत ६ जानेवारी रोजी रोख रक्कम व शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे . डॉ प्रा . काळबांडे हे मागील २० वर्षापासून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करून समाज प्रबोधनासाठी विविध उपक्रम राबवून पत्रकारीतेला सामाजिक कार्याची जोड दिली त्यांनी आपल्या लेखनीतून शेतकरी , कष्टकरी, यांचे सह सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून त्यांनी कार्य केले आहे त्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना मराठी पत्रकारांच्या कल्याणार्थ कार्यरथ प्रमुख संस्था महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी संस्थापक अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, उपाध्यक्ष धनंजय जाधव , कृष्णा शेवडीकर , कार्यकारी विश्वस्त विजय मांडके यांच्या स्वाक्षरीने त्यांच्या निवडीचे पत्र प्राप्त झाले आहे . पुरस्कार मिळाल्या बद्दल जेस्ट साहित्यिक प्रा . डॉ . जगदीश कदम ,प्रा . रविचंद्र हडसणकर , प्राचार्य नागनाथ पाटील, महात्मा फुल दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रेय काळे , दैनिक वृत्तपत्र संघाचे अध्यक्ष डॉ . विशाल माने व सर्व पत्रकार यांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांचेवर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .
( सोबत फोटो )

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *