राजकारण

मतदान निकाल पारदर्शकतेसाठी सर्व पक्षीय उमेदवारानी मागणी मतदान यंत्राची 24 तासाची फुटेज व स्ट्रॉंग रूम समोर प्रतिनिधी म्हणून सी सी टीव्ही कॅमेरा

मतदान निकाल पारदर्शकतेसाठी सर्व पक्षीय उमेदवारानी मागणी मतदान यंत्राची 24 तासाची फुटेज व स्ट्रॉंग रूम समोर प्रतिनिधी म्हणून सी सी टीव्ही कॅमेरा

 

ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकटे

नरगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवार 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून 3डिसेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार होता. मात्र नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लांबणीवर पडून निवडणुकांचा एकत्रित निकाल 21 डिसेंबरला लागणार असा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकाल दिला असल्याने २ डिसेंबर रोजी मतदान झाले असून मतदान यंत्र आता स्ट्रॉंग रूम मध्ये २१ डिसेंबर पर्यंत ठेवण्यात येणार आहे. यावर उमेदवार निवडणूक आयोगाची प्रक्रिया कायदेशीर होत नाही यावर नाराजी व्यक्त करून मतमोजणी थांबवणे योग्य नसून कुठेतरी लोकशाहीला हानी पोहचत असल्याचे बोलल्या जात आहे. तसेच लोकांनी दिलेल्या उमेदवार राला जनमत सुरक्षित आणि कोणताही त्यात गैरप्रकार होऊ नये म्हणून ढाणकी नगर पंचायत नगर अध्यक्ष सर्व पक्षीय उमेदवार यांनी निवडणूक निर्णय अधिकार ढाणकी नगर पंचायत यांना निवेदन देत,ढाणकी नगरपंचायत सन २०२५ च्या सर्वत्रिक निवडणूकीमध्ये नगर पंचायतच्या अंतर्गत शासकीय अन्नधान्य गोडाऊन मध्ये मत पेट्या ठेवण्यासाठी स्ट्रॉग रुम तयार करण्यात आलेली आहे. या स्ट्रॉग रुमचे निकाल लागेपर्यंत दररोजचे २४ तासाचे सि.सि.टिव्ही फुटेज देण्याची व तिथे लक्ष ठेवण्यासाठी आमचा प्रतिनिधी म्हणून सी. सी.टीव्ही कॅमेरा बसवण्याची मागणी केली आहे.यावेळी निवेदन देताना,नगर अध्यक्ष उमेदवार सौ. अर्चना सुंदरकांता वासमवार शिवसेना (उबाठा),सौ. आरती राजु कलाले शिवसेना (शिंदे), सौ. रेखा रमेश गायकवाड राष्ट्रीय कॉग्रेस तसेच नगरसेवक उमेदवार बाळू पाटील चंद्रे, दत्त दिगंबर वानखेडे,कांता वासमवार,रवी ढोबळे सोबत राजू कलाले,होले सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *