राजकारण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापुढे शिव सेना शिंदे गटात शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला प्रवेश.  

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापुढे शिव सेना शिंदे गटात शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला प्रवेश.

 

ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकटे

राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात अनेक पक्षप्रवेश होताना दिसत असताना.ढाणकी शहरात काही महिण्याखाली पक्ष प्रवेश घेऊन संजय सल्लेवाड ढाणकी शहर अध्यक्ष यांनी ढाणकी मध्ये शिवसेना शिंदे गटाला बळकट करत शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश मेळावा घेतला होता.आज ढाणकी शहरात त्यांच्या सामाजिक आणि कार्यकर्ते यांच्या सोबत पुरण्या ताकतीने उभे राहण्याच्या वृत्तीने आज तालुका अध्यक्ष प्रवीण पाटील मिराशे यांच्या उपस्थिती मध्ये सेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला. या प्रवेशाने शिवसेना ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आपली ताकद दाखवणार असून शिवसेना शिंदे गटाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये पगडा भारी रहाणार असं यावेळी तालुका अध्यक्ष प्रवीण पाटील मिराशे व ढाणकी शहर अध्यक्ष संजय सल्लेवाड यांनी म्हटलं आहे.यावेळी शिव सेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *