क्राईम डायरी

अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांच्या जाळ्यात ….!

अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांच्या जाळ्यात ….!

 

लपून छपून वाळू चोरी सुरू असल्याने पथकाच्या नेमणुकाची मागणी

 

श्रीक्षेत्र माहूर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधि,

गणेश राठोड़,शेकापुर

 

माहूर तालुक्यातील मौजे पानोळा ते मांडवा अंजनखेड रस्त्यावर अवैधरित्या वाळू चोरून नेणाऱ्या ट्रॅक्टरला पोलीस पथकाने दि 26 रोजी रात्री 9 वाजता पकडून पोलीस ठाण्यात आणून जमा केल्याची घटना घडली असून, वाळू तस्कर रात्री बे रात्री लपून छापून वाळू चोरी करत असल्याने आठवडाभरात वाळू चोरि करणारे दोन ट्रॅक्टर पोलिसांनी पकडल्याची घटना घडल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी विशेष पथकाची नेमणूक करण्याची मागणी होत आहे

 

माहूर तालुक्याला वळसा घालून गेलेल्या पैनगंगा नदी पात्रात प्रचंड वाळू असून अनेक मोठाले नाले या नदीला जोडलेले असल्याने तालुका भरात अनेक गावातील नागरिकांनी वाळू तस्करीसाठी ट्रॅक्टर टिप्पर आणले त्यामुळे रात्रंदिवस वाळू चोरी सुरू आहे. शासनाकडून नऊ अधिकृत वाळूघाटापैकी एकही वाळू घाटाचा लिलाव झालेला नसल्याने वाळूतस्कर रात्रीला लाईट बंद करून वाळू चोरी करत असल्याचे आठवडाभरात दोन ट्रॅक्टर पकडल्याने सिद्ध झाले आहे

 

दि 26 रोजी रात्री 9 वाजता पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचे सह सपोनी शरद घोडके, हे पोलिसासमवेत गस्तीवर असताना पानोळा ते मांडवा रस्त्यावर ट्रॅक्टरचा आवाज आला संपूर्ण रस्त्याची वेगाने वाहन चालवत पाहणी केली असता लाईट बंद करून ट्रॅक्टर वाळू भरून जात असलेला दिसल्याने त्यास पकडण्यात आले विचारपूस केली असता पानोळा ते मांडवा अंजनखेड वाळू भरून अंजनखेड येथील वाहन चालक मालक नेतांना आढळून आले त्यामुळे ट्रॅक्टरला वाळूसह पोलिसांना माहूर पोलीस ठाण्यात आणून जप्त केले या कारवाईत पोलीस निरीक्षक गणेश कराड सपोनी शरद घोडके पोउपनी संदीप अन्येबोईनवाड पोहेका लक्ष्मण मेश्राम बालाजी राठोड पवन राऊत मारुती चव्हाण गजानन जाधव यांचे सह पोलीस सहभागी होते

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *