ताज्या घडामोडी

ए.आय.एम.आय.एमच्या जिल्हा समन्वयक फैजान खान ऊर्फ (फैजु लाला)पदी यांची निवड.

*एआयएमआयएमच्या जिल्हा समन्वयक फैजान खान ऊर्फ (फैजु लाला)पदी यांची निवड*

 

महागाव/२५ सप्टेंबर २०२५ रोजी कारंजा येथे ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन (AIMIM) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी यांच्या हस्ते यवतमाळ एआयएमआयएमच्या जिल्हा समन्वयक पदी फैजान खान ऊर्फ (फैजु लाला) यांची निवड

महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील फैजान खान ऊर्फ( फैजु लाला) यांची निवड करण्यात आली. फैजु लाला हे AIMIM पक्षात आधी पासुनच प्रवेश होता. आधी ते महागाव तालुका अध्यक्ष पदी कार्यरत होते. त्यांचा चांगला प्रतिसाद‌ पक्षाला मिळाल्या बद्दल त्यांना जिल्हा समन्वयक पद दिले.ऑल इंडिया

मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर श्री. असदुद्दीन ओवैसी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. इम्तियाज जलील यांच्या आदेशानुसार, मजलिसचे संघटन मजबूत करण्यासाठी आणि श्री. असदुद्दीन ओवैसी यांचे विचार समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचावेत यासाठी यवतमाळ जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्त करण्यात आली. या वेळी युसुफ पुंजानी एआयएमआयएमचे व्हॉइस प्रेसिडेंट यांचा हस्ते फैजान खान यांना सत्कार करण्यात आला.व समन्वयक पत्र देण्यात आले. व तसेच या प्रसंगी एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष अंजुम लाला उपस्थित होते. तसेच आजी -माजी पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यवतमाळ प्रतिनिधी: लतिफ शेख

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *