ताज्या घडामोडी

उदे ग अंबे उदे च्या गजरात हजारो भाविकांनी घटस्थापनेला लावली हजेरी. श्री रेणुका मातेला पहिली माळ अर्पण करुण मान्यवरांच्या उपस्थितीत घटस्थापना संपन्न.

उदे ग अंबे उदे च्या गजरात हजारो भाविकांनी घटस्थापनेला लावली हजेरी.

श्री रेणुका मातेला पहिली माळ अर्पण करुण मान्यवरांच्या उपस्थितीत घटस्थापना संपन्न.

 

नामदार राधाकृष्ण विखे पाटील,

नामदार पंकजाताई मुंडे,प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांची हजेरी.

 

श्रीक्षेत्र माहूर/नांदेड़ जिल्हा प्रतिनिधि :- गणेश राठोड़,शेकापुर

 

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी सम्पूर्ण एक मुळ शक्तीपीठ असलेल्या माहूर गडावर नवरात्र उत्सवास आज दि. २२ रोजी सकाळी ७ वाजता पासुन मातृतिर्थ तलावातील मातृतिर्थ आणून अभिषेक करुन ११ वाजुन ३० मिनिटांनी घटस्थापना होऊन नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे.रेणुका मातेच्या गडावर भक्तांची मदीयाळी असू, “उदे ग अंबे उदे” च्या गजराने मंदीर परीसर दुमदुमून गेला होता. घटस्थापनेच्या वेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि नामदार पंकजाताई मुंडे यांनी मातेचे दर्शन घेवुन महाआरती केली .

दि २२ पासुन सुरूवात झालेल्या शारदीय नवरात्र अश्वीन शुद्ध प्रतिपदेला संबळ वाद्यांचा निनादात ‘ऊदे ग अंबे उदे’ च्या गजरात मंदीर गाभार्‍यात पहील्या माळेला सकाळी सात वाजता पासून श्री रेणुका मातेच्या वैदिक महा पूजेने सुरूवात झाली.श्री रेणुका मातेच्या मुख्य गाभार्यातील व परीसरातील परिवार देवता श्री तुळजाभवानी मंदीर, श्री परशुराम मंदीर,श्री महालक्ष्मी मंदिरात एका दगडाच्या कुंडात मातृका भरुन त्यात पाच प्रकार चे धान्य टाकुन, कुंडावर मातीची कलश,त्यात नागवेलीची पाने व श्रीफळ, सभोवताल पाच उसाचे धांडे उभारुन आणि त्या अधारे कलशावर पुष्पहार चढवून सकाळी ११:३० च्या दरम्यान घटस्थापना करण्यात आली.व पंचामृताने अभिषेक करण्यात आला.घटस्थापने नंतर संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा प्रमुख, जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनिल वेदपाठक, यांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. तर देविला पिवळ्या रंगाचे पैठणी महावस्त्र अलंकार अर्पण करून सिंगार करण्यात आले.घटस्थापने नंतर छबिना मिरवणूक काढण्यात आली. परिसरातील देवी देवतांची पूजा नैवेद्य व आरती कुमारिका पूजन करण्यात आले.यावेळी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश तथा श्री रेणुकादेवी संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष सुनिल वेदपाठक,संस्थानचे पदसिद्ध सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोन्तुला (भाप्रसे) यांच्या हस्ते करण्यात आली.या वेळी संस्थानचे पदसिद्ध उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे संस्थानचे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार अभिजित जगताप, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव,अरविंद देव,विनायक फांदाडे,बालाजी जगत,दुर्गादास भोपी, पुजारी भवाणीदास भोपी, शुभम भोपी,समीर भोपी नातंह कैलास जेठे यांची उपस्थिती होती.

 

प्रतिपदे पासुन दशमी पर्यंत मंदीरात अखंड देवी समोर नंदादिप तेवत ठेउन दरोरोज पायास म्हणजे दही भात, पुरणपोळीचा नवैद्य,आरती नंतर छबिना,कढला जाउन,रेणुका ज्या गडावर प्रकटली त्या गडाला प्रदक्षीना घालुन छबिना परत रेणुका मंदिरात येत असतो. नवरात्र दरम्यान दररोज भाविक भक्तांना महाप्रसादाचा लाभ दररोज शप्तशती,शतचंडी ग्रथांचे पठण,महा आरती,महापुजा,हे कार्यक्रम नित्य नियमाने घेण्याचे नियोजन प्रशासकीय मंडळाकडुन करण्यात आले आहे.

 

मंदिर फुलांनी सजले – भाविकांच्या गर्दी ने फुलले

 

साडेतीन शक्तिपीठांपैकी मूळ पीठ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या श्री रेणुका मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवास आज घटस्थापनेने प्रारंभ झाला आहे. माहूर गडावर प्रशासन आणि मंदिर संस्थानच्या वतीने उत्सवाची तयारी करण्यात आली असून मंदिर ला फुलांनी सजविण्यात आले आहे.

 

आज सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र आहे. अत्यंत रमणीय आणि निसर्गरम्य तसेच डोंगर आणि जंगलांनी व्यापलेल्या माहूर गडावर रेणुका माता विराजमान असून महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश सह देशभरातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. श्री रेणुकामातेच्या नवरात्र उत्सवास घटस्थापनेपासून प्रारंभ होतो. घटस्थापने पूर्वी श्री रेणुका देवीचे मंदिर फुलांनी सजविण्यात आले होते

 

नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशीच दुपारी हजारो भाविक रांगेतून मातेचे दर्शन घेत असताना पावसाने जोरदार विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोंथूला तहसीलदार अभिजीत जगताप पोलीस निरीक्षक गणेश कराड मुख्याधिकारी विवेक कांदे नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी श्री रेणुका देवीचे व्यवस्थापक योगेश साबळे यांचे पोलीस होमगार्ड आणि न प कर्मचारी देवस्थान वरील सुरक्षारक्षकांनी भाविकांना त्रास होऊ नये याची खबरदारी घेतली

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *