ताज्या घडामोडी

महागाव तालुक्यात साई (ई)येथील वीज कोसळून चार शेळ्यांचा मृत्यू, शेतकरी जखमी.ढगफुटीसदृश पाऊस.

महागाव तालुक्यात साई (ई)येथील वीज कोसळून चार शेळ्यांचा मृत्यू, शेतकरी जखमी.ढगफुटीसदृश पाऊस.

यवतमाळ जिल्हा विशेष प्रतिनिधी: गोपाल एच राठोड

 

शेतमालांचे प्रंचड नुकसान

शेतकरी हवालदिल अनेक भागात पूरसदृश परिस्थिती

 

महागाव : तालुक्यात गुरुवारी दुपारच्या सुमारास पुन्हा एकदा विजेच्या कडकडाटासह ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसामुळे शेतपिकांचे प्रंचड नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकट कोसळले आहे.

गुरुवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास अचानक आकाशात काळे ढग दाटून आले. त्यानंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच पावसाचा जोर वाढल्याने अनेक भागात ढग फुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.अनेक भागात विजेचा तांडव पाहायला मिळाला. या पावसाचा सर्वाधिक फटका काळी दौलत यासह साई इजारा आणि परिसराला

बसला आहे.मागील आठवड्या भरापूर्वी झालेल्या अतिवृष्टीपेक्षा देखील यावेळी पावसाचा जोर अधिक पाहायला मिळाला. पावसामुळे परिसरातील नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले होते. तर अनेक भागात पूरसदृश परिस्थिती.निर्माण झाली होती. या पावसाचा सर्वाधिक फटका शेत पिकांना बसला आहे. शेतकऱ्यांवर नैसर्गिक प्रकोप आणि सतत संकटांची मालिका सुरू आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.

 

*वीज कोसळून चार शेळ्यांचा मृत्यू, शेतकरी जखमी*

*महागाव तालुक्यातील साई इजारा काळी (दौ)परिसरात गुरुवारी दुपारच्या सुमारास झालेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसाचा शेतपिकांना मोठा फटका बसला आहे. यामध्ये साई इजारा गावातील २५ ते ३० घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. तसेच वीज कोसळून साहेबराव मोरे हे गंभीर जखमी झाले असून चार शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये उत्तम रामजी इंगळे यांच्या दोन बकऱ्या, अर्जुन खंदारे आणि साहेबराव मोरे यांच्या प्रत्येकी एकाच शेळीचा वीज कोसळल्याने मृत्यू झाला आहे.*

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *