संत गुरु रविदास चौक हगंदरी मुक्त करून सभागृह व प्रभोधनकेंद्र साठी जागा द्या, अन्यथा अमरण उपोषण चा इशारा
ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकटे
ढाणकी नगरपंचायत प्रभाग क्र. ३ मधील संत गुरु रविदास महाराज चौकामधील नगरपंचायतच्या मालकीची मालमत्ता क्र. ०४/१ मधून मोकळी जागा उपलब्ध करुन देण्याचं ठराव 17मे 2022 रोजी नगर पंचायत सर्व साधारण सभेत दिला होता ती जागा अजूनही नगरपंच्यात अधिकारी यांनी मोजून दिली नाही. चर्मकार समाजाने हगंदरी मुक्त करुन ती जागा देण्याची मागणी केली आहे . गुरु रविदास चौकाजवळील हगंदरी मुळे व तेथील घाण कचऱ्यामुळे चर्मकार वस्तीत प्रचंड दुर्गंधी पसरत असून तेथे डुकारांनी “धुडगूस” घातला आहे. या घाणीमुळे वस्तीत रोगराई वाढली असून डासांचा प्रादुर्भाव होऊन डेंगू मलेरिया या सारखे आजार पसरू लागले आहे,तसेच गणेशराव चंद्रे पाटील यांनी ग्रामपंचायतवेळेस दलीत वस्तीसाठी हातपंप दिला होता ती नगरपंचायतने तोडफोड करुन उखडून नेल्यामुळे त्या ठिकाणी बोअरवेलचा खुला खड्डा पडल्याने त्या खड्ड्यात लहान किंवा मोठा पडून काही दुर्घटना घडल्यास त्यास ढाणकी नगरपंचायत प्रशासनला जाबाबदार धरू. तसेच ढाणकी शहर हगंदरीमुक्त आहे ते फक्त कागदावरच का ! एकीकडे शासन हगंदरीमुक्त गावे योजना राबवीत आहे आणि एकीकडे शहराला हगंदरी समस्याचे माहेरघर बनवण्यामध्ये नगरपंचायतचा सिंहाचा वाटा आहे की काय ? ढाणकी नगरपंचायतच्या कामचुकार कर्मचाऱ्यांच्या ठिसाळ नियोजनाचा त्रास चर्मकार समाजाला सहन करावा लागत आहे. तरी नगरपंचायतच्या वतीने हगंदरी मुक्त करुन त्या ठिकाणी क्रांतीकारी संत गुरु रविदास महाराज यांचे सांस्कृतीक सभागृह प्रभोदन केंद्र, वाचनालय नगरपंचायतच्या वतिने उभारण्यात यावे. वरील मागण्या पूर्ण न झाल्यास राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतिने येणाऱ्या काळात अमरण उपोषण करण्याचा इशारा गजानन मारोती सुरोशे,करण कामाजी परतुडे,दिपक बंडू सुरोशे व अन्य संघटना कार्यकर्ते यांनी निवेदन द्वारा दिले.



