माहूर तालुक्यातिल अतिदुर्गम भागात वसलेले मौजे तांदळा येथे डॉ.एम.एस. स्वामीनाथन,हरित क्रांतीचे जनक यांच्या जन्मशताब्दी निमित्त “”शाश्वत शेती दिन”” साजरा …!
नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर
या कार्यक्रमात मा.श्री.ए.एम. यलपलवाड,मंडळ कृषी अधिकारी ता. माहूर यांनी दि.07 आगष्ट च्या शाश्वत शेती दिनानिमित्त प्रस्तावना करून शेतकऱ्याबाबत श्री.एम.एस. स्वामीनाथन यांच्या जीवनाला उजाळा दिला.व महेश तहाडे यांनी त्या कार्यक्रमात स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती अंतर्गत जमलेल्या शेतकरी बांधवांना नैसर्गिक शेतीमध्ये अवलंबण्यात येणाऱ्या जैविक व झाड पाल्यापासून तसेच गायीच्या शेण व गोमूत्रापासून घरच्या घरी तयार होणाऱ्या जीव अमृत बिजा,अमृत दर्शनी अर्क, निंबोळी अर्क, तसेच समता गटांतर्गत व जैविक केंद्राबद्दल माहिती देण्यात आली. यापुढे सौ.सूर्यकांता विठ्ठल खंदारे,सहायक कृषी अधिकारी, यांनी उपस्थिताना राष्ट्रीय नैसर्गिक शेती बद्दल विषयाचे मार्गदर्शन केले.तसेच सद्याच्या स्थितीत पिकांच्या असलेल्या महाडीबीटी योजनेची माहिती दिली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तादळा गावच्या अतिशय लोकप्रिय तथा संयमी महिला सरपंच सौ. दुर्गाताई संतोष जाधव ,उपस्थित होत्या .
तर कार्यक्रमाच्या शोभेसाठी गावातिल प्रगतशील शेतकरी विलास सूर्यभान कदम , गणेश बळीराम जाधव,सर्व शेतकरी महिला,तथा शेतकरी बांधव उपस्थित होते. तसेचआभार प्रदर्शन संतोष जाधव यानी केले. तर ग्रामपंचायत सदस्य गजानन जाधव , ग्रामपंचायत सदस्य सायरा बी.शे.फकीर ,इस्माईल खान ,शेख हबीब शेख मदार, उत्तम मणिराम राठोड, मोतीराम पवार ,लक्ष्मीबाई पिंपळे, सौ वच्छला बाई कांबळे सह असंख्य शेतकरी बान्धव उपस्थित होते.
आशा अतिदुर्गम भागात वसलेल्या गावात “”शास्वत शेती दिन”” कार्यक्रम रबाविल्यामूळे सरपंच सौ.दुर्गाताई संतोष जाधव यानी कृषिविभागाचे आभार माणले.तर गावाकर्याच्या वतीने संबधित टीमवर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.




