स.पो.नि रमेश जाधवर यांचा पोलीस अधीक्षकाच्या हस्ते सन्मान ….!
श्रीक्षेत्र माहूर ग्रामीण प्रतिनिधी :- संतोष निळकंठवार, मलकागुडा
माहूर तालुक्यातील शिंदखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरक्षक रमेश जाधववर यांनी 78 टक्के वॉरंट निर्गमित मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, यांच्या हस्ते नुकतेच त्यांना सन्मानपत्र प्रसिद्धी देऊन गौरव करण्यात आला . पोलीस स्टेशन सीन्दखेडे हे माहे जून 2025 या महिन्यात ७८ टक्के वारंट निर्गमित्त करून उत्कृष्ट कामगिरी केली . असुन त्यांनी अविरत दिलेल्या सेवेचे सन्मान करण्यासाठी नांदेड पोलीस दलाच्या वतीने स.पो.नी. रमेश जाधववर यांचा गौरव करण्यात आला आहे. यावेळी पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.



