ताज्या घडामोडी

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ढाणकी भाजप तर्फे भव्य रक्तदान शिबिर.

*tv9 माझा लाईव्ह न्यूज.*

 

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ढाणकी भाजप तर्फे भव्य रक्तदान शिबिर.

 

ढाणकी प्रतिनिधी :मिलिंद चिकटे.

 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, भारतीय जनता पार्टी ढाणकी शहर व ढाणकी ग्रामिण तर्फे भा.ज.यु.मो. जिल्हा महामंत्री रोहित वर्मा यांचे मार्गदर्शनात, ढाणकी भाजप शहराध्यक्ष बाळू योगेवार व ढाणकी ग्रामीण मंडळाध्यक्ष विक्रम राठोड यांचे नेतृत्वात भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले.सकाळी ठीक ११ वाजता रक्तदान शिबिरास सुरुवात झाली.याप्रसंगी भाजपा सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष बळवंतराव नाईक, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दत्त दिगंबर वानखेडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गजानन पाटील गाडेकर, ढाणकी चे नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री रोहित वर्मा, शहर भाजपचे अध्यक्ष बाळू योगेवार, ढाणकी ग्रामीणचे अध्यक्ष विक्रम राठोड, ज्येष्ठ नेते आनंदराव चंद्रे, प्रकाश जयस्वाल,पुंजाराम हराळे, दिपक चंद्रे, रमेश गायकवाड, गणेश नरवाडे, शेख इब्राहिम, दत्ता सुरोशे, महेश शहाणे, सुदर्शन देवरकर, शेख शाहरुख, मल्हार चंद्रे,विनायक अक्कावर, विष्णू फुलेवार, ऋषी भागवत यांसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

सायंकाळ पर्यंत जवळपास ५० रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान केले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *