ताज्या घडामोडी

माहूर / गुंडवळ येथील सरपंच,रामेश्वर जाधव यांची पत्रकारना साद,….!

माहूर / गुंडवळ येथील सरपंच,रामेश्वर जाधव यांची पत्रकारना साद,….!

 

 

विरोधकाकडून बनावट आणी खोट्या तक्रारि करुण बदनाम करन्याचा केविलवाना प्रकार.

 

 

श्रीक्षेत्र माहूर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी

गणेश राठोड़

 

विकास कामांच्या खोट्या तक्रारी करून ज्या प्रकरणाशी आपला संबंध नसताना हेतुपुरस्पर आपल्याला बदनाम करण्याच्या उद्देशाने खोट्या तक्रारी करण्याचे काम विरोधकाकडून सुरू असल्याची माहिती सरपंच,, रामेश्वर किसन जाधवळ, ग्रामपंचायत कार्यालय गुंडवळ यांनी दिलीआहे. माहूर तालुक्यातील गुंडवळ येथील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत नळ जोडणी चे काम पूर्वपथावर असताना गटविकास अधिकारी तसेच पाणीपुरवठा उप अभियंता पंचायत समिती माहूर व जिल्हा परिषद नांदेड ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला अर्ज देवून अर्जामध्ये केवळ पाच ते दहाच कनेक्शन दिल्याची खोटी तक्रार केली आहे. अर्जाच्या अनुषंगाने संबधित अधिकारी तथा कर्मचारी गावात पंचनामा करिता आले असता ,त्यांच्या निदर्शनास एकुन् 130 कनेक्शन चालू व दहा ते बारा मोडक्या आवस्थेत आढळून आले आहे. जल जीवन मिशन योजनेचे पाईपलाईन 400 मीटर गावांमध्ये झाले असतानाच उर्वरित काम थांबवण्यात आले होते. विरोधकाकडून कत्राटदाराला अतोनात त्रास दिल्यामुळे कत्राटदार काम सोडून निघून गेले होते .उर्वरित काम झालेले नसल्यामुळे ग्रामपंचायत मार्फत नळ कनेक्शन चे केवळ 26 कनेक्शन बाकी राहिले होते. उर्वरित काम चालू असतानाच खोटी तक्रार देऊन काम थांबवण्याचे काम तक्रारदारांनी केलेला आहे .सरपंचाला व ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला बदनाम करण्याचे हेतूने खोटे अर्ज विरोधकाकडून करण्यात येत आहे .व विनाकारण कामाच्या निधीतून टक्केवारीची मागणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून केलेली आहे, सदर काम निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून जिल्हा परिषद च्या पाणीपुरवठा विभागाने राबवून कामाचे कत्राट देण्यात आले आहे .सदर काम अंदाज पत्रकाप्रमाणे करण्यात आले असून गावातील काही विघ्न संतोषी लोकांनी मी थेट जनतेतून निवडूनाअल्याने विरोधकाना पोटसूळ उठल्याने विकास कामांच्या खोट्या तक्रारी करण्याचे काम त्याच्या कडून सुरू आहे.गुंडवळ हे गाव तालुक्यांच्या डोंगराळ भागात असल्याने विकास कामाचा लवचिक सुद्धा इकडे फिरकला नव्हता .

पूर्वी 35 वर्ष बारिबारिने सरपंच पदाची धुरा सांभाळणारे विघ्न संतोषी लोकांच्या हातून सत्ता जाऊंन मानसिक संतुलन बिघडल्यामुळे विरोधक एकजुटीने विकास कामांचा विनाकारण विरोध करून कामांमध्ये अडथळा निर्माण करत आहे. परंतु आपण सरपंच झाल्यावर अनेक विकास कामे करण्यास सुरुवात केली.आणी त्यापैकी कही कामे पूर्णत्वास गेले असून उर्वरित कामे जलदगतिने चालू आहे.त्यामुळे गावकऱ्यांमध्ये समाधानांचे वातावरण झाले आहे .परंतु आपण करीत असलेले विकास कामे विरोधकांना पहावल्या जात नसल्यामुळे विनाकारण तक्रारी करण्याचा उपदव्याप ही मंडळी सतत करीत आहे .सदर नळ कनेक्शनाचा पंचनामा करिता आलेले उप अभियंता यांनी गावाला भेट दिली असता, कामांचे स्वरुप पाहून समाधान व्यक्त करुण राहिलेले काम पूर्ण करण्यास सांगितले .कामांचा गौरव केला सदर तक्रारदार हा प्रत्येक विकास कामाचे अगोदरच काम बोगस होत असल्याची बतावणी करून संबंधित कत्राटदार आनि अधिकाऱ्यांना वेठीस धरून आर्थिक मागनी करन्याचा त्यांचा हा गोरख धंदा नित्याचाच झाला असून,त्याबाबतचे आपल्याकडे पुरावे सुद्धा आहेत ,त्यामुळे विकास कामांच्या खोट्या तक्रारी करून आपली बदनामी करणाऱ्या या लाछखोर तक्रारदार महाश्यावर आणी त्यांच्या इतर सहकार्यावर आपण पोलीस तक्रार दाखल करणार असल्याची माहिती सरपंच रामेश्वर किसन जाधव यांनी दिली आहे. नळ कनेक्शन चे काम गुणवत्ता पूर्ण व नियमाप्रमाणे गुंडवळ ग्रामपंचायत येथील नळ जोडणी अंदाजपत्रक निकर्षाप्रमाणे करण्यात आले असून या कामाला उपअभियंता अभियंता पाणीपुरवठा विभाग व थर्ड पार्टी अधिकारी यांनी पण कामाची वेळोवेळी भेटी देऊन कामांच्या गुणवत्ते बाबत समाधान व्यक्त केला आहे. काही गावातील विकृत मंडळीने जाणून बुजून नळ कनेक्शन तोडलेले आहे .ते पण संबधित अधिकार्‍याच्या निदर्शनास आलेले आहे .यास्तव गावातली नागरिक पण कामाबद्दल समाधानकारक असल्याचे स्पष्टीकरण अधिकाऱ्यासमोर दिलेले आहे.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *