आरोग्य

ढाणकी येथील आरोग्यवर्धिनी केंद्र नावालाच वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णाची होते हेळसांड.

ढाणकी येथील आरोग्यवर्धिनी केंद्र नावालाच वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णाची होते हेळसांड.

 

ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकाटे:

 

आरोग्यवर्धिनी केंद्रे प्राथमिक आरोग्य सुविधा पुरवतात, ज्यामुळे लोकांना त्यांच्या जवळच्या ठिकाणी आरोग्य सेवा मिळू शकते. त्यासाठी शासनाने सार्वजनिक आरोग्यविषयीची सेवा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्यवर्धिनी केंद्रे उभारले आहे. पण ढाणकी आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये प्राथमिक आरोग्य सुविधा मिळत नसून आरोग्यवर्धिनी केंद्र फक्त नावाला झाला आहे. आज नऊ दिवसापासून या आरोग्यवर्धिनी केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने केंद्रात येणाऱ्या रुग्णाची हेळसांड होत आहे. आज रोजी आश्रम शाळेतील आठ ते दहा विद्यार्थी आरोग्यवर्धिनी केंद्रा मध्ये आले असता फक्त आरोग्य अधिकारी नसल्याने तिथल्या आरोग्य सेवक यांनी शिक्षकाला आरोग्यवर्धिनी केंद्रापासून अंदाजे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले. आरोग्यवर्धिनी केंद्र यासाठी देण्यात आला आहे की,प्राथमिक आरोग्य सुविधा रुग्णाला जवळ भेटले पाहिजे पण इथे उलट रुग्णाला संदर्भित करतात तेही इलाजा साठी अंदाजे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या प्राथमिक आरोग्यात .यावर ढाणकी आरोग्यवर्धिनी केंद्रात रुग्णासाठी काहीच सुविधा नसून फक्त नावालाच आरोग्यवर्धिनी केंद्र आहे का? म्हणत नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहे.

ढाणकी आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये नियुक्त असलेल्या वैदकीय अधिकारी अश्विनी कदम यांनी 1 जुलै ला नोकरी सोडली आहे. या ठिकाणी दुसरा वैदकीय अधिकारी नियुक्त करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला असून लवकरात लवकर वैदकीय अधिकारी नियुक्त करण्यात येईल अशी माहिती आहे.आरोग्य सहायक उमरखेड, कपाटे

About The Author