ताज्या घडामोडी

ध्येयवेड्या तरुणाने नाईक जयंती केली प्रतिमेचे वाटप करून साजरी

ध्येयवेड्या तरुणाने नाईक जयंती केली प्रतिमेचे वाटप करून साजरी

ढाणकी – प्रतिनिधी, मिलिंद चिकाटे

हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांचे देशासाठी फार मोठे योगदान आहे शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे हे स्वप्न बाळगून त्यांनी महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न केला अशा महामानवांचे विचार समाजापर्यंत पोहोचावेत समाजाने त्यांच्याकडून दिशा घ्यावी म्हणून दराटी येथील भाजपा यवतमाळ – पुसद जिल्हा समन्वयक नितीनभाऊ चे खन्दे समर्थक, निकटवर्तीय् तथा भाजप चे बंदी भागातील दराटी बिटरगाव जिल्हा परिषद चे पळभर दावेदार बबन भाऊ जाधव यांनी चक्क स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे तांड्या तांड्यात जाऊन वाटप करून जयंती साजरी केली .

अतिदुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दराटी येथील प्रमेश्वर उर्फ बबन भिम जाधव या तरुणाने स्व वसंतराव नाईक यांचे विचार तांड्या , वाड्यातील समाजापर्यंत पोहचावे म्हणून चिंचोली (तांडा ) , अकोली , मन्याळी , बिटरगांव , भोजु नगर , रतन नाईक नगर , पिंपळगांव , मोरचंडी, टाकळी , दराटी , जवराळा , मुरली , सहस्त्रकुंड , शिवाजी नगर या ठिकाणी स्व वसंतराव नाईक यांच्या प्रतिमांचे वाटप केले त्याचबरोबर वसंतराव नाईक विद्यालय बिटरगांव व पोलीस स्टेशन बिटरगांव येथे सुद्धा प्रतिमा भेट दिली . यावेळी त्यांचे सोबत माजी सैनिक देवराव आडे, गजानन राठोड , किशोर जाधव , दशरथ राठोड , विर राठोड , गजानन राठोड पिंपळगांव , देवानंद राठोड , धर्मा राठोड , गणेश नाईक , संदीप जाधव , रमेश राठोड , गोलु मुडे , गोपाल आडे, पंकज आडे उपस्थित होते .

बिटरगांव पोलीस ठाण्यात प्रतिमा भेट देतांना उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड , ठाणेदार पांडूरंग शिंदे व बबन जाधव .

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *