गणवेश सक्तीवरून महागाव/ पुसद सोशिअल मीडियावर तीव्र पडसाद.
यवतमाळ जिल्हा विशेष प्रतिनिधी महागाव /पुसद :- गोपाल एच राठोड
शाळांकडून नियमांना हरताळ” गणवेश खरेदीत शाळा-दुकानदार मॅच फिक्सिंग..?
यवतमाळ जिल्ह्यातील. महागाव जत तालुक्यातील इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज (कायम विना अनुदानीत, स्वंयः अर्थसहाय्यीत) महागाव पुसद तालुक्यातील शाळेच्या आडमुठ्या धोरणाने विद्यार्थ्यांचा गणवेश महागला पालकांमध्ये त्रीव नाराजी काळी दौ सर्कल मधील काही इंग्लिश मीडियम स्कूल शिक्षण संस्थेच्या शाळा व नामांकित स्कूल’ तसेच इंग्लिश मीडियम स्कूल काळी दौलत & एज्युकेशन या शाळेच्या प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणांमुळे एका वर्षात कपड्याचे रंग व काही सिल्याबस बदलले आहे व विद्यार्थ्यांच्या गणवेशाची किंमत.वाढल्याने व गणवेश कलर बदलल्यामुळे पालक वर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शाळेने विशिष्ट दुकानातूनच गणवेश खरेदी करण्याची सक्ती केल्यामुळे, पालकांना चढ्या दराने गणवेश विकत घ्यावे लागत असल्याचे चित्र सर्वत्र असून काही आरोपही पालकांनी केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गणवेश खरेदीसाठी व बुक्स संपूर्ण तालुक्यात केवळ एकच दुकानाची निवड असून या दुकानांमध्ये गणवेशाची किंमत बाजारातील इतर दुकानांपेक्षा २५ ते ३० टक्क्यांनी अधिक असल्याचे पालकांचे व या दुकानातील व बाहेरील दुकानातील बिलावरुन निरदर्शनास येते.
एका संतप्त पालकाने सांगितले, शाळेच्या या धोरणामागे आर्थिक साठेलोटे असल्याचा संशय पालक व्यक्त करत आहेत. “एक किंवा दोन दुकानातून गणवेश खरेदी करण्यास सक्ती करणे हे पूर्णपणे चुकीचे आहे.यातून दुकानदार नाहक फायदा पोहोचवला जात आहे आणि गणवेश खरेदी केला नसेल तर विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये असे सक्ती संबंधित वर्ग शिक्षकांची होत आहे व आर्थिक बोजा मात्र पालकांवर पाडत आहे,’ या संदर्भात एका शाळेतील शिक्षकांसोबत संस्क साधला असता त्यानी या बाबीवी चौकशी करून गणवेशा बाबद पैसे मध्ये.तफावत आढळून आल्यास योग्य तो न्याय पालकास देऊ असे यावेळी एका शाळेतील शिक्षकाने यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी शी बोलतांना सांगितले. शिक्षण विभागाकडे माहिती अधिकार अधिनियम २००५ या संदर्भात अनेक माहिती व तक्रारी गेल्या असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. शिक्षण विभागाने तातडीने या प्रकरणात लक्ष घालून शाळेच्या या आडमुठ्या धोरणांना आळा घालावा, अशी मागणी पालक वर्गाकडून व सामाजिक कार्यरत्याकडून केली जात आहे.विशिष्ट दुकानातून खरेदीची सक्ती नाही शाळा पालकांना गणवेश, पुस्तके किंवा इतर शालेय साहित्य विशिष्ट दुकानातूनच खरेदी करण्याची सक्ती करू शकत नाहीत. पालकांना ते त्यांच्या सोयीनुसार आणि आर्थिक क्षमतेनुसार कुठूनही खरेदी करण्याचा अधिकार आहे. मात्र शाळा व्यवस्थापन समित्यांना गणवेशाचे डिझाइन, रंग आणि खरेदी प्रक्रिया ठरवण्या-चे अधिकार आहेत. परंतु, याचा अर्थ असा नाही की ते पालकांवर विशिष्ट दुकानाची सक्ती पाचवेळी स्पोर्ट आणि गणवेश खरेदी भात पडत आहे
*
*शिक्षण विभागाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात
शिक्षण विभागाकडे या संदर्भात वारंवार तक्रारी केल्या आहेत. परंतु, या तक्रारींवर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. नियमांना कैराची टोपली दाखवणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईची मागणी सर्वसामान्य जनता करत आहेत. शिक्षण विभागाचे दुर्लक्ष किंवा त्यांची संदिग्ध भूमिका, यामुळे शाळांना नियमांची पायमल्ली करण्याची मुभा मिळत असल्याची भावना पालकांमध्ये आहे. या गंभीर समस्येवर शिक्षण विभागाने तातडीने लक्ष घालून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महागाव तालुक्यातील काळी दौलत मधील पालक करत आहेत. अन्यथा, पालकांच्या सहनशीलतेचा अंत होऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.




