महागांव / भाजपा आमदाराच्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध
महागांव :भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांच्या आक्षेपार्ह शेतकरी विरोधी विधानाचा संध्या संदेश रणवीर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे तहसीलदार महागांव मार्फत देऊन निषेध व्यक्त केला.
भाजपा आमदाराने कृषी प्रधान देशातील शेतकरी हा पोशिंदा असून अन्न,वस्त्र,निवांऱ्याची गरज भगवण्यासाठी शेतीत राब राब राबून उत्पन्न काढणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाला उद्देशून सभेत आक्षेपार्ह विधान केले त्याबाबत या माथेफिरू आमदाराला जरब बसवून शेतकऱ्यांची माफी मागण्यास भाग पाडावे अन्यथा शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन उभारण्याचा संध्या रणवीर यांनी इशारा दिला आहे.
निवेदन हे निवासी नायब तहसीलदार व्ही. व्ही. पवार यांनी निवेदन स्वीकारले यावेळी गजानन कोरडे व कार्यकर्ते उपस्थित होते.



