शेकापूर येथील जी.प.प्रा. शाळेत सेवापूर्ती सोहळा संपन्न …!
श्रीक्षेत्र माहूर नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर
जी.प.प्रा.शाळा शेकापूर ता. माहूर येथील सहायक शिक्षक व्ही.पी.कदम सर हे 30/06/2025 ला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्यामुळे,त्यांचा ऱ्हदयसत्कार जी.प.प्राथमिक शाळेत, गावच्या महिला सरपंच सौ.सीमाताई, समाजसेविका मीराबाई कांबळे, मु.अ.शिवाजी गायकवाड सर,यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सेवक संतोष जाधव,अंगणवाडी सेविका सोनूताई,,,गावातील प्रतिष्ठित नागरिक संतोष राठोड,विवेकभाऊ राठोड, आदेश चव्हाण, लक्ष्मण जाधव, करण जाधव,पृथ्वी राठोड, तसेच शाळेतील विध्यार्थी/विध्यार्थीनीसह गणेशभाऊ मित्र मंडळाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित राहून,सेवानिवृत्ती नंतरचा आयुष्य सुखकर तथा आरोग्यदायी आणी भरभराटीचे जाओ आशा मंगलमय शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सर्वांनी अलपोहराचा मनसोक्त असा स्वाद घेतला.





