ताज्या घडामोडी

माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावर बोअरवेल ट्रकची दुचाकीस जब्बर धडक दुचाकीवरील दोघे गंभीर यवतमाळला रेफर..!

माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावर बोअरवेल ट्रकची दुचाकीस जब्बर धडक दुचाकीवरील दोघे गंभीर यवतमाळला रेफर..!

 

“दुचाकीवरील दोघांचे पाय चेंदामेंदा ; आसोली फाट्यानजीकची घटना”

 

 

श्रीक्षेत्र माहूर /नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर

 

माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील आसोली फाट्यावर बोअरवेल मशीनवाहक ट्रकने कामावरून मोटरसायकल द्वारे परत येत असलेल्या दुचाकीस्वारांना जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाल्याची घटना आज दि. १३ रोजी सकाळी 7:00 वाजता घडल्याने,दोन्ही दुचाकी स्वरांचे पाय कापण्यासारखि परिस्थिती निर्माण झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.माहूर तालुक्यातील कसारपेठ आश्रमशाळा परिसर येथील लिंगू शंकर आडे, वय २८ व संजय तुकाराम येरमे, वय २३ वर्षे हे दोन युवक आज सकाळी त्याची दुचाकी क्र. एम.एच. २६ बी.आर. ६३०९ या दुचाकीने माहूर येथे काही कामानिमित्त गेले होते. तेथून परत येत असताना सकाळी 7:00 वा. च्या सुमारास माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील आसोली फाट्यानजीक वाई बाजार कडून माहूरकडे जात असलेल्या बोअरवेल मशीन वाहक ट्रकची जोराची धडक . या धडकेत दुचाकीवरील दोन्ही युवकांच्या उजव्या पायाचा अक्षरश: चेंदामेंदा झाला असून, मांडीच्या हाडाच्या ठिक-या उडाल्या तर एकाच उजवा हात आणि उजव्या पायाची बोटे पण मोडलेली आहे. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होत असल्याने, डॉ. बीपीन बाभळे यांनी यवतमाळला रेफर करण्याआधी एकावर रुग्णवाहिकेत तर दुसऱ्या जखमीवर दवाखान्याच्या बाहेरच उपचार करून तत्परता दाखवत तात्काळ यवतमाळला हलविले.

अपघाताची माहिती वाई बाजारच्या रुग्णवाहिका चालक प्रशांत कोरे यांना मिळाल्याने त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ दोन्ही जखमींना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विपीन बाभळे यांच्यासह त्याच्या सहका-यांनी प्राथमिक उपचार करून,दोन्ही जखमी युवकांना पुढील उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय रूग्णालयात पाठविले. माहूरच्या ग्रामीण रुग्णालयाची 108 ॲम्बुलन्स अनेक दिवसापासून नादुरुस्त असल्याने, सतत होत असलेल्या अपघातातील जखमींना बाहेरगावी उपचारासाठी पाठवण्यास अडचण निर्माण होत असल्याने, माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दोन 108 ॲम्बुलन्स द्यावे अशी मागणी होत आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *