महागांव / माळवागद ग्रामपंचायतमधील अनियमितता प्रकरण.जिल्हा परिषदेसमोर उपोषणकर्त्याचा ठिय्या आंदोलन.
यवतमाळ जिल्हा विशेष प्रतिनिधी गोपाल एच राठोड.
पुसद /महागाव : तालुक्यातील
माळवागद ग्रामपंचायतील अनियमिततेची तक्रार दिल्यानंतर चौकशी अहवाल प्राप्त झाला. या नंतरही संबंधितांवर कारवाई करण्यात आली नाही. परिणामी दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी १० जूनपासून माळवागद येथील तक्रारकर्ते पृथ्वीराज चव्हाण यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषणाला.सुरुवात केली आहे.
महागाव तालुक्यात ग्रामपंचायत माळवागद मध्ये शासकीय निधीचा आर्थिक व्यवहार झाल्याबाबत.. चव्हाण यांनी तक्रार केली होती.त्या तक्रारीवरून दोन वेळा महागाव पंचायत समितीमार्फत चौकशी करण्यात आली. त्या चौकशी अहवालात गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध झाले. त्यावरून तक्रारीची दखल घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांनी दुसऱ्या.तालुक्यातील
अधिकाऱ्यांची.चौकशी समिती गठित केली.त्या कमिटीमध्ये गटविकास अधिकारी उमरखेड चौकशी प्रमुख तसेच शाखा अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग उमरखेड सदस्य व विस्तार अधिकारी पंचायत समिती उमरखेड सदस्य या कमिटीने ग्रामपंचायत माळवागद येथे जाऊन चौकशी केली.यात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे सिद्ध झाले. समितीकडून चौकशी अहवाल सादर करण्यात आला. यामुळे माळवागद.ग्रामपंचायतीच्या अनियमितेत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करणे अपेक्षित होते.मात्र सर्वस्तरावर पाठपुरावा करू नही संबंधितावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात न आल्याने अखेर पृथ्वीराज चव्हाण सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता यांनी या प्रकरणात जिल्हा परिषदे यवतमाळ कार्यालय समोर उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. जो पर्यंत संबंधितावर कारवाई होणार नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेण्यात येणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे.




