उमरखेड : सुकळी उडानपुलजवळ महागांवच्या २ जणांचा अपघात एक ठार तर एक जखमी.
मुख्यसंपादक : एस.के. चांद यांची बातमी.
तुळजापूर नागपूर राष्ट्रीय महामार्ग महागाव ते उमरखेड कडे जात असताना माजी आमदार राजेंद्र नजरधने यांचे भाऊजी विलास पुंडलिक इंगळे, हे अपघातात जागीच मृत्यू पावले. यांच्या पश्चात १ मुलगी सोळा वर्षाची. १ मुलगा बारा वर्षाचा. व पत्नी व दोन भाऊ एक बहीण व आई वडील असा त्यांचा परिवार होता. ते आरणी चे रहिवासी असून तो महागाव येथे पिग्मी एजंट पतसंस्थेचे काम करत होते.त्यांच्यासोबत असलेले सहकारी मनोज कदम महागाव हे जखमी झाले आहे.हा अपघात सुकळी येथे अंदाजी दुपारी झाला असून विलास इंगळे हा सर्वसामान्य जनतेमध्ये मनमिळाऊ असल्यामुळे अत्यंत दुःखत घटना घडली आहे.




