ताज्या घडामोडी

माहूरकरांनी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांना वाहिली आदरांजली. 

माहूरकरांनी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांना वाहिली आदरांजली.

 

श्रीक्षेत्र माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर

 

भारतीय जनता पक्षाचे आधारवड तथा लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी दिनांक 3जुन 2025रोजी सकाळी साडेनऊ वाजता दत्त चौक (टिपॉईंट) साजरी करण्यात आली

 

यावेळी तालुका़ध्यक्ष निळकंठ मस्के, नगरसेवक महामुने भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय आमले विजय आमले, नंदकुमार जोशी,अनिल वाघमारे महीला शहराध्यक्षा सौ.स्वातीताई आडे, विनायक मुसळे,शिवसेना उबाठा गटाचे जितु चोले,यांच्या हस्ते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.

स्व.गोपीनाथरावांनी सर्वसामान्यांच्या उत्थानासाठी आपले जिवन खर्च केले.अचानक रीत्या ते आपल्यातून निघून गेल्याने महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे मोठे नुकसान झाले असून त्यांचा आदर्श घेवून मोदी सरकारच्या ध्येय धोरणाचा लाभ समाजातील शेवटच्या व्यक्तीला मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहो अन् तिच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल असे मत तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के यांनी व्यक्त केले यावेळी शहराध्यक्ष पुरुषोत्तम लांडगे, रामकृष्ण जायभाये,यांच्या सह विविध समाज संघटनेचे पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.

 

यावेळी भाजपा तालुका प्रमुख निळकंठ् मस्के, अनिल वाघमारे विजय आमले,नगरसेवक गोपू महानुने, कृष्णा जायभाये, शंकर भालेराव,बालाजी मुंडे,नंदकुमार जोशी, विनायक मुसळे,सुमित दाराडे, बाळू फड,छगन जाधव, निलेश तायडे स्वाती आडे मॅडम यांच्या सह शिवसेनेचे जितू चोले आणि समाजाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *