ढाणकी दगडांच्या ढिगाऱ्यामुळे रस्त्यावर चालणे झाले त्रासदायक.
ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकाटे:
हे चित्र ढाणकी ते बिटरगाव कडे जाणाऱ्या रोडवरील करंजी ते अकोली फाट्याजवळील रस्त्याचे आहे.जो की, रोड बांधकाम किंवा देखभालीच्या कामामुळे दगडांच्या ढिगाऱ्यांनी अर्धवट बंद झाला आहे. रस्ते वाहतुकीसाठी मोकळे राहणे आवश्यक आहेत जेणेकरून रस्त्यावर चालताना वाहनाचे अपघात होऊन लोंकानचे प्राण जाऊ नये , पण बांधकाम विभागाच्या ढीसाळ कारभारामुळे रस्त्यावरील दगडांच्या ढिगाऱ्यामुळे या रस्त्याने वाहने आणि लोकांना चालतना जीव मुठीत घेऊन प्रवास करवा लागत आहे.पावसाळ्याचे दिवस असल्याने या रस्त्यात मोठ मोठे खड्डे पाण्याने भरल्याने रस्ता दिसत नसल्याने मोठया त्रासाने रस्त्यावरून जावे लागत असल्याने या भागातील नागरिक त्रासले आहे.रस्त्याचे काम लवकरात लवकर करून होणाऱ्या अपघाताला आळा घालण्याची मागणी नागरिक करत आहे.