ढाणकी येथे ‘तिरंगा रॅली’ला नागरिकांचा मोठा प्रतिसाद.
ढाणकी प्रतिनिधी:मिलिंद चिकाटे.
ऑपरेशन सिंदूर’ द्वारे पहलगाममध्ये पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्याला योग्य उत्तर देणाऱ्या भारतीय सैन्याला अभिवादन करण्यासाठी आणि सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी बुधवार दि 22 रोजी दुपारी 4वाजता आयोजित ‘तिरंगा रॅली’ला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
ढाणकी छञपती शिवाजी माहाराज चौक येथून तिरंगा यात्रा काढण्यात आली.छञपती शिवाजी माहाराज चौक ते तगडपलेवार चौक ते भगतसिंग चौकमार्गे फिरत संविधान चौक यात्रेचा समारोप करण्यात आला.
भारत देशाच्या सुरक्षासाठी आपले प्राण पणाला लावून लढणाऱ्या भारतीय सेनादलातील सैनिकांना या यात्रेच्या माध्यमातून मानवंदना देण्यात आली या यात्रेदरम्यान येथील माजी सैनिक यांचा सन्मान करण्यात आला.यात ढाणकीगावातील देशभक्त नागरिकांनी अतिशय उत्साहात भारतीय सैन्याच्या या कामगिरी प्रती कृतज्ञता व्यक्त