ताज्या घडामोडी

बिटरगाव पोलिसाच्या अहवानाला भरभरून प्रतिसाद.महीला सुरक्षा व सक्षमिकरण शिबिर 88मुली रवाना.

बिटरगाव पोलिसाच्या अहवानाला भरभरून प्रतिसाद.महीला सुरक्षा व सक्षमिकरण शिबिर 88मुली रवाना.

 

उमरखेड तालुका प्रतिनिधी, मिलिंद चिकाटे

बिटरगाव पोलिस स्टेशन चे ठाणेदार कैलास भगत यांनी परिसरातील जनतेला महीला सुरक्षा व सक्षमिकरण शिबिराला यवतमाळ येथे प्रशिक्षणासाठी जाण्यासाठी अहवान केले होते या अहवानाला भरभरून प्रतिसाद मिळाला असुन परीसरातील 88मुली हे प्रशिक्षण घेण्यासाठी यवतमाळ येथे दाखल झाल्या आहेत प्रशिक्षणाला जाण्यापूर्वी ठाणेदार कैलास भगत यांनी सर्व मुलींना मार्गदर्शन केले त्या मध्ये मानवसमूहात स्त्रीजातीचा जवळपास निम्मा हिस्सा आहे. स्त्रियांना हतोत्साहित करणारे वर्तन करून, त्यांचा जीवनस्तर उंचावण्याकडे दुर्लक्ष करण्यापासून ते त्यांचा छळ आणि अत्याचार करण्यापर्यंत अनेक प्रकारे हीनत्वाची वागणूक स्त्रीजातीला मिळत राहिली आहे. हा भेदभाव दूर करून स्त्रियांच्या प्रगतीस पोषक वातावरणाची निर्मिती आणि त्याचे सुचालन करणे आणि लैंगिक समतेद्वारे (जेंडर इक्वॅलिटी) समाजाचे संतुलन साधणे यासाठी पुरोगामी आणि विवेकी समाजाने बाळगलेला दृष्टिकोन केलेली कृती यांचा समुच्चय म्हणजे स्त्री सक्षमीकरण, असे थोडक्यात म्हणता येईल.

 

महिलांनी फक्त ‘चूल आणि मूल’ याकडेच लक्ष दिले पाहिजे असे अनेक जणांना वाटते, पण आता महिलांनी चुला आणि मुलासोबतच ‘देश आणि विदेश’ यांकडेसुद्धा लक्ष देण्याची गरज आहे.

 

मानवी हक्कांविषयी अनेक आंतरराष्ट्रीय करारांत मान्यता मिळूनही, स्त्रिया निर्धन आणि निरक्षर राहण्याचे प्रमाण मोठे आहे. वैद्यकीय सुविधा, मालमत्तेची मालकी, पतपुरवठा, प्रशिक्षण आणि रोजगारात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना कमी संधी मिळते. त्या पुरुषांच्या तुलनेत राजकीयदृष्ट्या सक्रिय असण्याची शक्यता फारच कमी आहे, आणि त्या घरगुती हिंसाचाराचा बळी होण्याची शक्यता खूपच मोठी आहे. स्त्रियांची मानसिकता बदलणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागात स्त्रिया अजूनही स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत. तेथे त्या पुरुषांच्या निर्णयावर अवलंबून राहतात. त्यांची निर्णय क्षमता वाढणे गरजेचे आहे. घटनेने अनेक अधिकार दिलेले आहेत, याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचली पाहिजे, प्रबोधन झाले पाहिजे. स्त्री अजूनही १००% सक्षम आहे हे आपण मान्य करू शकत नाही असे मार्गदर्शन बिटरगाव पोलिस स्टेशन चे ठाणेदार कैलास भगत यांनी केले या वेळी जमादार रवि गिते रोशन सरनाईक दत्ता कुसराम निलेश भालेराव यांनी मुलींना बस मध्ये पाठविण्यासाठी पुढाकार घेतला.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *