क्राईम डायरी

रेती घाटावर प्रत्यक्ष पथक प्रमुख तथा नायब तहसीलदार डॉ. राजकुमार राठोड यांनी घाटातील रेती रस्ते काढले खोदून. नांदेड प्रतिनिधी : गणेश राठोड.

रेती घाटावर प्रत्यक्ष पथक प्रमुख तथा नायब तहसीलदार डॉ. राजकुमार राठोड यांनी घाटातील रेती रस्ते काढले खोदून.

 

नांदेड प्रतिनिधी : गणेश राठोड

 

डॉ.राजकुमार राठोड नायब तहसीलदार.तथा पथक प्रमुख,आणी कैलास जेटे.नायब तहसीलदार यांची धडक कारवाई.

 

अवैध रेती साठा जप्त करून केले पंचनामे, रेती माफीयाचे अवैध उत्खनन रोखण्यासाठी महसूल विभागाचे पथक डे नाईट नदीपात्रात ऑन ड्युटी.

 

नांदेड/माहूर:- प्रतिनिधी गणेश राठोड

 

माहूर तालुक्यातील पैनगंगा नदी पात्रात मोजे सायफळ घाटासह वडसा पडसा चोले पेंड या रेती घाटावर बनवलेला रेती चोरांचा रस्ता काही दिवसापूर्वी खोदला होता. परंतु ते रस्ता पूर्ववत बनवून अवैधरित्या रेती उत्खनन होत असल्याची विश्वासनीय माहिती मिळाल्याने, सहायक जिल्हाधिकारी झेनित चंद्र दोंथुला, तहसीलदार किशोर यादव, यांच्या आदेशाने पथक प्रमुख तथा नायब तहसीलदार डॉ. राजकुमार राठोड, नायब तहसीलदार कैलास जेठे, यांनी मध्यरात्री जाऊन पोलीस बंदोबस्तात वादग्रस्त सायपळ घाटासह इतर घाटावर जाणारे रस्ते पूर्णता खोदून काढल्याने,त्यांच्या या धडक कारवाईने पुन्हा एकदा रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे. गेली आठ दिवसापासून तहसीलदार किशोर यादव यांच्या आदेशाने पथक प्रमुख नायब तहसीलदार, डॉ. राजकुमार राठोड,यांनी तालुक्यातील पैनगंगा नदी पात्रात असलेले वैद्य आणि अवैद्य सर्वच रेतीघाटावरील रस्त्यावर जेसीबी द्वारे मोठमोठे खंदक खोदणे सुरू केले असून, रेती तस्करीवर आळा घालण्यासाठी महसूल विभाग ॲक्शन मोडवर आल्याचे चित्र दिसत आहे. परंतु सदरील धडाकेबाज काम करत असताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यास रेती तस्करांकडून अनेक वेळा धमकावणे, वाहनाचा पाठलाग करणे, वाहन मिळू न देणे, या यासारखे प्रकार सर्रास होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी तर पुढारी आणि स्वयंघोषित पत्रकार नाहक त्रास देत असल्याच्या घटना वाढताना दिसत आहे. त्यामुळे सहायक जिल्हाधिकारी दंतोला यांनी तात्काळ पथक प्रमुखांना 24 तास अग्निशास्त्र आणि पोलीस बंदोबस्त मिळावा. अशी मागणी सुद्धा केल्याचे कळते. पथक प्रमुख डॉक्टर राजकुमार राठोड हे रेती माफियांच्या मुळावरच उठल्याने, रेती तस्करी जवळपास बंद झाल्याचे दिसत आहे. महसूल विभागाने रेती तस्करांवर धडक कारवाई करत असल्याने तथा रेती तस्करीवर आळा घालण्या कमी, रात्री बेरात्री नदीपात्रात जंगलात गस्तीवर जावे लागत आहे. त्यामुळे अधिकाराच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मा. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी ही बाब लक्षात घेऊन संबंधित अधिकारी कर्मचारी यांना 24 तास अग्निशास्त्र बाळगण्याची परवानगी देऊन, घरकुलधारकांना पाच ब्रास मोफत रेती मिळावी. अशीही मागणी जनसामान्यातून होत आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *