माहूर /मौजे कोलामखेड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.
माहूर संतोष निळकंठवार यांची बातमी.

प्रा आ केंद्र वाईबाजार अंतर्गत ग्राम कोलामखेड येथे मा मुख्यमंत्री महोदय यांचा १०० दिवसांचा कार्यक्रम विशेष मोहीम अंतर्गत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले यामध्ये आज रुग्णांची NCD स्क्रिनिंग करण्यात आली यामध्ये HB , रक्तदाब ,मधुमेह ,मुखाचा कर्करोग ,स्तनाचा कर्करोग ,गर्भपिशवीचा कर्करोग ,Co morbid रुग्ण इत्यादी बाबींची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी यामध्ये HB इत्यादी बाबींची तपासणी करण्यात आली यावेळी माहूरचे नायब तहसीलदार श्री राजकुमार राठोड साहेब ,वाई ग्रामपंचायत चे सरपंच श्री सीताराम मडावी , उपसरपंच श्री उस्मान खान पठाण ,सर्व ग्रामपंचायत सदस्य , आरोग्य विभागातर्फे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ पुंडलिक भुरके , डॉ वैभव लहाने ,श्री लक्ष्मण जोगपेठे ,श्रीमती व्ही पी नेताम ,श्री गिरीश कुलकर्णी ,श्रीमती हर्षना भगत ,श्रीमती सुलोचना राठोड ,श्रीमती उषा वाघमारे ,कु गीतांजली मडावी ,श्री बालाजी मोरे ,श्री विठ्ठल कोत्तापल्ले ,श्री संतोष घुगरे ,श्री सुमित सूर्यवंशी ,श्री सुदर्शन गेडाम ,श्री हनमंत अंदुलगे , सर्व आशा ताई इत्यादी उपस्थित होते .





