Mahur : वॉरियर जिम माहूरचे वसीम भाई बनले सद्भावनेचे प्रतीक.
आज धार्मिक विद्वेष वाढताना चे चित्र आहे. शुल्लक कारणावरून मंदिर मज्जित प्रश्नावर दोन धर्माचे तर.कधी कधी जातीत जातीत संघर्ष पाहायला मिळतो. मात्र अशाही स्थितीत माहूरचे वसीम भाई यांनी आपला धार्मिक एकोपा व सद्भावना जोपासत एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.माहूर शहरातील वॉरियर मेन्सवेअर तथा वारियरजिमचे ओनर वसीम भाई.यांनी ईदच्या पावनपर्वावर हिंदू समाजाच्या अनेक मित्रांना बोलवून आपल्या निवासस्थानी शीरखुर्मा पार्टी देऊन त्यांची योग्य ती सेवा केली आहे.वसीमभाई हे माहूर शहरासह आजूबाजूच्या खेड्यात धार्मिक कार्यक्रमांत सहभाग घेऊन,अनेक वेळा वर्गणी सुद्धा देत असतात.वसीम भाई चे हे कार्य एकंदरीत धार्मिक एकतेचा व सद्भावनाना संदेश देणार आहे. त्यामुळे अनेक हिंदू मुस्लिम मित्रांकडून त्यांचं कौतुक केल्या जात आहे.
ब्युरो रिपोर्ट tv9 माझा लाईव्ह न्युज साठी गणेश राठोड.