ताज्या घडामोडी

पुसद / श्री.निखीलेश जयस्वाल हे गावाच्या व परिसराच्या विकासाठी नेहमीच तत्पर.

पुसद / श्री.निखीलेश जयस्वाल हे गावाच्या व परिसराच्या विकासाठी नेहमीच तत्पर.

 

 यवतमाळ विशेष प्रतिनिधी गोपाळ राठोड.

 

सोनी टि.व्ही. स्टार ह.भ.प. परिक्षीतची महाराज मोरे यांचे प्रतिपादन

 

आपल्या देशामध्ये पाश्चात्य संस्कृतीचे राजरोसपणे पालन होत असतांना काळी दौ. येथील गुरूदेव सेवा मंडळ एक अनोखा उपक्रम राबविला. वाढदिवसाचे औचित्य साधुन अनेक धनाढ्य आपल्या पैशाची उधळपट्टी करतात व मध्य सेवन व ओल्या पार्थ्यांचे आयोजन करुन केक कापतात. व या मुळे तरुणाई ही व्यसनाकडे वळत आहे. अशातच काळी दौ. येथील गुरूदेव सेवा मंडळ तरुनांना व्यवसनापासुन दूर नेन्यासाठी अनोख्या पध्दतीने वाढदिवस साजरा करण्याचे व मार्गदर्शन करण्याच कार्य करत आहे..

 

येथील गुरूदेव सेवा मंडळाचे पदाधिकार्यांनी काळी दौ. येथील युवा उद्योजक व सुपरिचीत समाजसेवक श्री. निखीलेश बलदेव जयस्वाल यांचा वाढदिवस २८/०३/२०२३ रोजी मोठ्या उत्साहात साजरा केला. या वेळी निखीलेस जयस्वाल यांच्या निवासस्थानी जावुन सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची प्रतिमा व शाल, श्रीफळ देवुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 

निखीलेश जयस्वाल हे गावाच्या व परिसराच्या विकासाठी नेहमीच तत्पर असतात मात्र कुठलाही मोठे पणा न करता सोसल मिडीयामध्ये कुठल्याही प्रकाचे बडेजाव न करता दिन दलीत दुबळ्यांना व समाजाला योग्य मार्गदर्शन व यथायोग्य तन मन धनाने सहकार्य करतात. मात्र परद्यामागुन हे त्यांचे विशेष असल्याचे या वेळी बोलतांना सोनी टि.व्ही. स्टार ह.भ.प. परिक्षीतची महाराज मोरे म्हणाले अश्याच प्रकारचे समाजाचे उत्थान त्यांचा हातुन घडो व ते गुरूदेव सेवा मंडळाचे मार्गदर्शक आहेत असेच मार्गदर्शन गुरूदेव सेवा मंडळास लाभो अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या.

 

या वेळी गुरूदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष सोनी टि.व्ही. स्टार ह.भ.प. परिक्षीतची मोरे महाराज, सर्वश्री.

 

परमेश्वर आगोसे, साहेबराव गावंडे, दत्ता मुकाडे, प्रल्हाद कोरडे, मदन मोरे, दिलीप वैद्य, मनोहर गोभेकर, कैलास कोरडे, बाला देवकर, विवेक गावंडे, गौरव मांडवगळे, अनिकेत गडवे, शुभम ढगे, अन्यना ओगोसे आदींची उपस्थीती होती.

या सत्कार शुभेच्छांनी समाजाप्रती व गुरूदेव सेवा मंडळाच्या प्रती माझी जबाबदारी वाढली असुन मी माझ्या आयुष्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे वहन करील. असे मत निखीलेश जयस्वाल यांनी सत्काराला व शुभेच्छांना उत्तर देतांना व्यक्त केले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *