यवतमाळ : विदर्भ जन आंदोलनच्या मशाल मोर्चाला यश, शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू.
मुख्य संपादक : एस के चांद यांची रिपोर्ट
महागाव:-विमा कंपन्यांच्या मनमानी कारभाराचा फटका बसुन तालुक्यातील हजारो शेतकरी पीक विमा मिळण्या पासुन वंचित राहिले होते या पीडित शेतकऱ्यांना पिक विमा मिळावा यासाठी विदर्भ जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे जगदिश नरवाडे यांच्या नेतृत्वात मशाल मोर्चा काढण्यात आला होता. याला यश येवुन अखेर पिक विमा कंपनीने नमते घेत या वंचित शेतकऱ्यांना पिक विमा मंजुर केला आहे.
खरीप हंगाम२०२४मध्ये महागाव तालुक्यातील ७१हजार१०५शेतकऱ्यांनी रिलायन्स पिक विमा कंपनीच्या निर्देशानुसार ऑनलाईन पद्धतीने रीतसर विमा काढला होता. शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांना विमा मिळणे अपेक्षित होते परंतु विमा कंपनीच्या प्रतिनिधी,अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना पैसे मिळण्याचे आमिष दाखवुन त्यांच्याकडून नगदी पैसे उकळून विमा क्लेम केले हे सर्व होवुनही विमा कंपनीने तालुक्यातील ३२हजार३९१ शेतकऱ्यांना जाणीवपुर्वक विम्याच्या लाभापासुन वंचित ठेवले याबाबत विदर्भ जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी आवाज उठवून पिडीत शेतकऱ्यांना तत्काळ पिक विमा देण्यात यावा यासाठी मशाल मोर्चा काढून आंदोलन केले होते तेव्हा विमा कंपनीने आपले प्रतिनिधी पाठवुन तात्काळ नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले परंतु अद्याप शेतकऱ्यांना विमा मोबदला मिळालाच नाही.तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया हे महागाव तालुक्यात आढावा बैठक घेण्यासाठी आले असताना जगदीश नरवाडे यांनी या विमा लाभा पासुन वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना घेवुन तहसिल कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून या शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्याची तसेच शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्या रिलायन्स पिक विमा कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली असताना जिल्हाधिकाऱ्यांनी विमा प्रतिनिधींनी बोगस सर्व्हे पंचनामे केल्यामुळेच शेतकरी लाभा पासुन वंचित राहिला असल्याची प्रतिक्रिया देत कंपनीच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करून शेतकऱ्यांना पीक विमा लाभ तत्काळ देण्यात यावा व विमा कंपनीवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.
पिक विमा मिळण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी जन आंदोलन आधार संघर्ष समितीने काढलेल्या मशाल मोर्चाला यश येवुन अखेर विमा कंपनीने या वंचित शेतकऱ्यांना पिक विमा देण्यास सुरुवात केली आहे. पिक विमा कंपनीने अनेक वेळा आंदोलन केल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय दिला नाही जी रक्कम देत आहे ती पंचवीस टक्केच च्या जवळपास आहे किमान 70% च्या वर रक्कम द्यावी तत्कालीन जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी अनेकवेळा शासन दरबारी पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय दिला त्याबद्दल त्यांचे जन आंदोलन आधार संघर्ष समिती च्या वतीने अभिनंदन जगदीश नरवाडे संस्थापक अध्यक्ष जन आंदोलन आधार संघर्ष समिती