ताज्या घडामोडी

माहूर गडावरील श्री चंडिका मातेच्या जंगलातील वनवा विझवला….

 माहूर गडावरील श्री चंडिका मातेच्या जंगलातील वनवा विझवला….

वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांचेसह कर्मचाऱ्यांची तत्परता…

माहूर प्रतिनिधी : तालुक्याला निसर्ग कृपेने खूप मोठे जंगल क्षेत्र लाभलेले असून उन्हाळ्यामध्ये पानगळ होत असल्याने अनेक ठिकाणी उष्णतेने किंवा काही नागरिकांच्या चुकामुळे वनवा पेटत असून अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांना पोहोचण्यासाठी वेळ लागत असल्याने वनवा जास्त प्रमाणात पसरत असतो अधिकारी व कर्मचाऱ्यांची पळापळ होत असते. दिनांक 18 रोजी रात्री श्रीक्षेत्र माहूर येथील श्री रेणुका माता मंदिरा कडे जाणाऱ्या मार्गावर गायमुख जवळील श्री चंडिका देवी मंदिराच्या परिसरातील जंगलात वनवा पेटल्याने नागरिकांनी सूचना देताच वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी तात्काळ कर्मचारी पाठवून वनवा विझवल्याने त्याचे अभिनंदन होत आहे.

माहूर तालुक्यातील वनक्षेत्र खूप मोठे असून प्रचंड उंच टेकड्या सखलदऱ्या पसरलेली आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात सागीझाडासह इतर वनस्पती झाडांची रेलचेल आहे पण काही नागरिक जंगलात वनौषधी आणि मुळे आणण्यासाठी जातात त्यामुळे त्यांच्याकडून चुका होत वनवा पेटत असतो. उन्हाळ्यात उष्णतेमुळे झाडांची गळालेली पाने पेट घेत असतात तसेच अनेक ठिकाणावरून विद्युत वाहण्या गेलेल्या असल्याने त्यांच्यातही उष्णतेमुळे स्पार्किंग होऊन ठिणग्या पडत असतात. त्यामुळे त्या ठिणगीचे रूपांतर वनवण्यात होत असल्याने, वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी प्रत्येक बीट मधील वनपाल वनरक्षकांच्या स्वाधीन फायर मशीन केलेल्या आहेत. त्यामुळे पूर्वीपेक्षा लवकरच वनवा आटोक्यात आणण्यात कर्मचाऱ्यांना यश येत आहे. वनव्याची कल्पना रोहित जाधव यांना नागरिकांनी दूरध्वनीवरून दिल्याने, त्यांनी तात्काळ वनपाल मीर साजिद अली, वनरक्षक निशांत दुर्गे, दीपक माने, सुरत चव्हाण, पहारेकरी परमेश्वर माधव नाईक, राम सातुलवार, तसेच वन मजुरांना पाठवून वनवा फायर मशीन द्वारे आटोक्यात आणला. यावेळी त्यांनी सांगितले की, नागरिकांनी तसेच वन्यप्रेमींनी वनवा ही सामाजिक जबाबदारी समजून, वनव्यासह इतर घटनांची तात्काळ कल्पना देत वनवा विझवण्यासाठी कर्मचाऱ्यांना मदत करावी असे आव्हान केले आहे.

यावेळी माहूरचे निर्भीड पत्रकार श्री इलियास भवानी यांनी संबंधितांना सर्वतोपरी मदत केली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *