ढाणकी :धम्मपरिषदा हया समाजाच्या ऊर्जा केंद्र बनल्या पाहिजे:-प्रो.अनिल काळबांडे.
ढानकी प्रतिनीधी :- मिलिंद चिकाटे.
उमरखेड :माणसाला माणसापासून कसे दूर करता येईल त्यांना जातीय वनव्यात कशी होरपळता येईल अशी एकंदरीत देशात परिस्थिती असताना बौद्ध धम्म परिषदेच्या माध्यमातून मात्र माणसाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी दुःखमुक्तीचा तथा सर्व मानव समूहाचे कल्याण व्हावं या दृष्टिकोनातून विचार पेरले जातात . बौद्ध धम्म हे अथांग ज्ञानाचे महासागर आहे या सागरामध्ये जो येईल त्याच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे धम्मपरिषद या समाजाचे ऊर्जा केंद्र बनले पाहिजे असे प्रतिपादन प्रख्यात आंबेडकरी विचारवंत प्रो. डॉ .अनिल काळबांडे यांनी केले ते तालुक्यातील हरदडा येथे आयोजित दुसऱ्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेमध्ये मार्गदर्शन करताना बोलत होते . सकाळच्या सत्रात सुजाताबाई दवणे यांच्या हस्ते तर प्रमुख मान्यवरांचा उपस्थीतीत पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले . या धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी जेष्ठविधीतज्ञ डी . एफ हरदडकर हे होते . तर सुरुवातीला भंते पय्याबोधी व उपस्थीत भिक्षू संघाच्या यांच्या हस्ते उपस्थितांना सामूहिक त्रिशरण पंचशील प्रदान करण्यात आले.
त्यानंतर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी या धम्म परिषदेचे उद्घाटन करून आपल्या मनोगतातून , विश्वाला तारणारा बुद्धाचा धम्मच असल्याचे प्रतिपादन केले. यानंतर या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक दादासाहेब शेळके , प्रशांत वाठोरे , अरुण दादा आळणे , अनिल साळवे , सरोज देशमुख , वीरेंद्र खंदारे , गौतम कदम ,दत्तराव काळे ,उत्तम सिंगणकर सुधाकर कांबळे (खरुसकर ), सरपंच सुनिल कवडे , सरपंच दैवशिला विलास पायघण ‘ अशोक कदम तामसा , जर्कीन रावळे , विजू कदम यासह मान्यवर धम्मपिठावर उपस्थित होते.
यावेळी समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा तथा महिला पोलीस पाटलांचा त्याचबरोबर जिथे बाबासाहेब आंबेडकरांचा निवास होता त्या तळेगाव दाभाडे येथून आलेले मोहन कांबळे , अशोक चिंचाळे मधुकर कांबळे ,यशवंत जोंधळे दिलीप वाहुळे तर हैदराबाद येथून आलेले धम्म कार्य करणारे अशोक चितोरे ,मोहन कांबळे ,यशवंत जोंधळे , दिलीप कसबे , मधुकर कांबळे किसन थुल त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते मिलिंद चिकाटे, रामराव गायकवाड,
यांसह समाजात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या धम्म परिषदेचे प्रमुख वक्ते दादासाहेब शेळके यांनी ‘ सुद्धा आपल्या प्रखंड आणि तरी यावेळी तेलंगणा राज्यातून आलेले अनिल साळवे , रामराव गायकवाड यांनी समाजाला एकसंघ झाल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही . तर अरुण दादा आळणे यांनी धम्म परिषदेच्या माध्यमातून धम्माचे विचार पेरल्या जावे व सर्व समाज एकसंघ व्हावा त्याचबरोबर किनवट येथे होणाऱ्या दोन दोन धम्म परिषदा ह्या निश्चित समाजाला दिशा देणाऱ्या नाहीत.
तेव्हा त्या एकसंघ व्हाव्या अशी त्यांनी आवाहन केले.
जिजाऊ बिग्रेडच्या सरोज देशमुख यांनी , तथागत बुद्धाच्या धम्मामध्ये व बाबासाहेबांच्या संविधानामध्ये जो महिलांना हक्क आणि अधिकार मिळाला त्यामुळेच सर्व क्षेत्रांमध्ये आज महिलांनी प्रगती केल्याचे त्यांनी सुचित केले . या भव्य दिव्य धम्म परिषदेचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्या प्रणिता कांबळे ,गौतम कांबळे व त्यांचे सर्व सहकारी तर यांनी परिश्रम घेतले .. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर कवडे व प्रदिप कांबळे यांनी केले . रात्रीला आकाश राजा व अंजली भारती यांच्या भीम गीताचा प्रबोधनाचा कार्यक्रम हजारोच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.