उमरखेड /महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना रा.प. कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी आंदोलन.
ढाणकी प्रतिनिधी :मिलिंद चिकाटे :महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना रा.प. कामगारांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांची पुर्तता होण्यासाठी आज
आंदोलन करण्यात आले यात कालावधीतील देय होणारी थकबाकी त्वरीत अदा करा.
सन २०१८ ची महागाई भत्त्याची थकबाकी कामगारांना अदा करण्याचा मा. न्यायालयाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करा.सन २०१६ ते २०२० या कालावधीसाठी एकतर्फी जाहीर केलेली वेतन वाढ यातील मान्य केल्याप्रमाणे घरभाडे भत्त्याचा दर ८,१६,२४ टक्के करुन थकबाकी त्वरित अदा करा.
सन २०१६ ते २०२० या कालावधीसाठी एकतर्फी जाहीर केलेली वेतन वाढ यातील वार्षिक वेतन वाढीचा दर पुर्वलक्षीप्रमाणे ३%करून त्याची थकबाकी त्वरित द्या.
सर्व देय थकबाकी रकमेच्या अधिन राहून कामगारांना सध्या मिळत असलेली वाढीव थकबाकी रक्कम पूर्वीप्रमाणे सुरु ठेवा.शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे रा.प. कामगारांचा महागाई भत्ता ५३ टक्के करून थकबाकीसह त्वरित द्या.
भविष्य निर्वाह निधीच्या खात्यातून कामगारांच्या मागणीनूसार त्वरित उचल द्या. प्रवासीभाडे वाढ पूर्वीप्रमाणे ५ रुपयांच्या पटीत करून सूधारित भाडे करा.अन्यायकारक शिस्त व आवेदन पध्दत रद्द करून नविन सुधारित शिस्त आवेदन पध्दत तयार करून लागु करा.कोरोना कालावधीत कामगारांचे घेतलेले रजेचे अर्ज रद्द करून त्यांना एल.डी.पी. (लॉकडाऊन हजेरी) लावून त्यांची रजा त्यांच्या खात्यावर वर्ग (संचित) करा.
बारा महिन्यात चालवण्यात येणाऱ्या रा.प. नियतांची सरासरी विचारात घेऊन कामगारांना समय वेतनश्रेणीवर (आर.टी.एस.) घेण्याचे मान्य केल्याप्रमाणे परिपत्रीय सूचना (आदेश) काढा व अंमलबजावणी करा.मल्टीट्रेड बाबत मा. महाव्यवस्थापक यांच्याकडून मान्य केल्याप्रमाणे यांच्या समवेत रा.प. प्रशासन व संघटना प्रतिनीधी यांच्या त्वरित बैठक घेऊन तोडगा काढा.
आर.टी.ओ. विभागाकडून होणारी दंडात्मक कारवाई चालकांच्या पगार खात्यातून वसूल करणे मान्य केल्याप्रमाणे त्वरित बंद करा. खात्यांतर्गत उत्तीर्ण झालेल्या कामगारांना बढत्या देतांना प्रथम बदली अर्जानूसार बदल्या देऊन उर्वरित रिक्त जागांवर बदल्या द्या. कार्यशाळा कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढा.कार्यशाळेला स्पेअर पार्ट पुरवठा करा अश्या मागण्या करत. दुपारी दि५/३/२५ रोजी राज्यव्यापी निदर्शन आंदोलन उमरखेड आगाराच्या गेट समोर१३:०० ते१३:३० दरम्यान करण्यात आले होते. यात प्रामुख्याने उपस्थित श्री सुरेश मोरे आगार सचिव,श्री सजंय शिरल्लू अध्यक्ष, कोषाध्यक्ष सजंय कदम, कार्याध्यक्ष विकास सुर्यवंशी, ईतर प्रमुख पदाधिकारी मध्ये सचिन मडके, दत्तराव उगले, श्रीराम तिवारी, संतोष फाळके,सदा फाळके,तामसकर,भारती, सचिन चांदीवाले यासह७५,८० सभासद हजर होते यात एसटी कामगारांच्या प्रमुख प्रलंबित मागण्या होत्या