माहूर /आगीत जळून भस्मसात झालेल्या शेतकऱ्याला सहृदयी मदतीचा हात कक्षाधिकारी प्रशांतभाऊ राठोड यांनी पुढे केला.
नांदेड जिल्हा : प्रतिनिधी गणेश राठोड.
निसर्ग पंचमहाभूतांनी वेढलेला आहे. अस्मानी आणि सुलतांनी संकटाचा सामना मायबाप शेतकर्यांना बारोमास करावा लागतो. असाच महाभयंकर संकटाचा सामना घर आगीत जळून भस्मसात झालेल्या शेतकऱ्याला करावा लागला. सहृदयी मदतीचा हात कक्षाधिकारी प्रशांतभाऊ राठोड यांनी पुढे केला. शेतकरी अहोरात्र काबाडकष्ट, हाडाचे काड करून आपल्या मेहनतीने अन्नधान्याच्या रुपाने मातीतून सोन पिकवतो. कुटुंबातील चिल्लापिल्लांनाही आवडीच्या वस्तु, खाऊपासून परावृत्त करतो आणि एक एक रुपया पैसा आपल्या पदराच्या गाठीला बांधतो. परंतु शेतकऱ्यांवर काही वेळेस असे काही प्रसंग ओढवतात क्षणार्धात होत्याच नव्हतं होऊन जाते.अशीच एक क्रूर पहाट काळाचा ज्वालाग्नी घेऊन उगवली त्यात सारा संसारच जळून खाक झाला. कासारपेट तांडा, ता. माहूर, जि.नांदेड येथील ठाकूर रामजी जाधव यांचे घरच नव्हे तर गृहोपयोगी वस्तु, भांडी- कुंडी ,अन्नधान्य, कपडा -लत्ता, सोने -नाणे, साडेतीन लाख पैशाची रोख रक्कम, अवजारे- हत्यारे आगीत जळून स्वाहा झाली. आनंदाने नांदणारा ठाकूर यांचा सुखी- कष्टी परिवार अचानक, अनपेक्षित खडकावर येऊन धायमोकलून रडू लागला.
शेतकऱ्यांनी रडाव तरी किती ? संकटाचा धावा करावा तरी किती ? कशा पध्दतीने त्यांनी जगावं ? असे अनेक कठीण प्रश्न त्यांना नेहमीच भेडसावत असतात. तरी मायबाप शेतकरी जगतो आहे. स्वतः जगून हा जगाचा पोशिंदा तमाम दुनियेला जगवतो आहे. परंतु स्वतःवरच जेंव्हा असे जीवघेणे संकट कोसळतात जगणं असह्य होते. कासारपेट तांड्यातील ठाकूर परिवार सारखा तिन दिवस रडत होता. तेहतीस कोटीचा धावा करत होता. कुणीही शासनाचा अधिकारी,पुढारी पंचप्यारे त्यांची आसवे पुसण्याकरीता पुढे सरसावला नाही. ही जीवघेणी करूण वार्ता मुंबई मंत्रालयात बसलेल्या प्रशांत राठोड नावाच्या कक्षाअधिकाऱ्याच्या कानी पडली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपले धाकटे बंधुवर्य अविनाश राठोड यांना सारखानी येथील बाजारपेठेत पाठवून गाडीत जेवढं सामान अन्नधान्य, किराणा सामान, गृहोपयोगी वस्तु तेवढं घेऊन ठाकूर परिवाराचे अघटित सांत्वन करण्याकरिता, आसवे पुसण्याकरिता भरल्या पावलांनी त्यांना पाठवले. स्वतः फोन करून ठाकूर दाम्पत्य पती- पत्नीस जगण्याची हिम्मत आणि धाडस दिली. याला म्हणतात सहृदयी व्यक्तिमत्त्व.
या मातृहृदयाविषयी मला कविवर्य अनंत राऊत यांच्या कवितेची एक ओळ आठवते,दुःख येणार नाही कधी, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा ” आज सहृदयी प्रशांतभाऊ राठोड यांनी ठाकूर परिवारास मदतीच्या रुपाने मायेचा गारवा दिला. आगीत जळून भस्मसात झालेल्या परिवाराची चुल पेटती केली. प्रशांतभाऊ (मो.- 9987557630) आपण आजतागायत अनेक रंजल्या गांजल्यांची आर्थिक,सामाजिक, कौटुंबिक, वैवाहिक सेवा केली आहे. कित्येक नव उपवर मुलींचे विवाह लावून दिले, कित्येकांचा दवाखाना करवून मरणाच्या दाढेतून प्राण वाचविले. गरीब होतकरू तरूणांना शैक्षणिक खर्च पुरविला. मागील महिन्यात विजय कांबळे नावाच्या सुशिक्षित बेरोजगारास माहूर येथे चहाची दुकान थाटून दिली. प्रशांतभाऊ नावाचा मदतीचा झर्रा प्रत्येक क्षणी आज अखंड, नितळ वाहतांना दिसतोय.
प्रशांतभाऊ आपण असेच अडल्या- नडल्यांच्या, रंजल्या-गांजल्यांच्या पाठिशी तटबंदी सारखे उभे राहावे अशी उन्नत शक्ती, धारिष्ट्य आपणास मिळो, ही सहृदयी मनोकामना…!
शब्दांकन :-दिनांक : 02/03/2025, रविवार.कल्लोळकार डाॅ.वसंत भा.राठोड, किनवट.
मो. नं. – 9420315409.