ढाणकी / संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सहात साजरी
ढाणकी प्रतिनिधी : मिलिंद चिकाटे.
आज 12 फेब्रुवारी संत शिरोमणी गुरुदेव श्री रविदास महाराज यांचा जन्म १४ व्या शतकातला. आज त्यांची ६४८ वी जयंती आहे. गुरु रविदास जयंती ही पूर्ण भारतात संत रविदास यांची जयंती माघ पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते. रविदास यांचा जन्म उत्तर प्रदेशातील सीर गोवर्धनपूर गावातील एका वंचित कुटुंबात झाला. मानवी हक्कांचे समर्थक असलेले रविदास हे एक प्रगतीशील विचारवंत होते ज्यांनी त्यांच्या कविता आणि अध्यात्मावर आधारित शिकवणींद्वारे
त्यांनी समाजासाठी “ऐसा चाहूं राज मैं, जहां मिलै सब को अन्न।
छोट-बड़ो सब सम बसै, रैदास रहै प्रसन्न॥” समानतेचा संदेश दिला.समाजाच्या बऱ्याच मोठ्या घटकावर जातीच्या नावाखाली हजारो वर्षे अन्याय झाला. अशा सर्व समाजांच्या उद्धारासाठी संत रविदास महाराजांनी काम केले. त्यांना स्वतःलादेखील या अन्यायाविरुद्ध संघर्ष करावा लागला. भारतीय इतिहास आणि साहित्यात संत रविदासांचे महत्वाचे स्थान आहे. त्यांनी शोषित-पीडित-वंचित-दलित जनतेच्या आकांक्षांना आपल्या रचनांमधून अभिव्यक्त केले. सामाजिक न्याय, सामाजिक समता आणि सर्वधर्म समभाव त्यांच्या वाणीचा मूळ स्वर आहे.
एक प्रसिद्ध कवी, त्यांच्या कविता शीख धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट आहेत. हिंदू अध्यात्मवादाच्या क्षेत्रातील एक प्रमुख व्यक्तिमत्व असलेल्या मीराबाई, गुरु रविदासांना आपले आध्यात्मिक मार्गदर्शक मानत असत. रविदासांना २१ व्या शतकातील रविदासीय धर्माचे संस्थापक मानले जाते. आज या महान संत रोहिदास महाराज शिरोमणी यांची जयंती ढाणकीतील सर्व चर्मकार बांधवानी संत रोहिदास महाराज शिरोमणी यांच्या प्रतिमेवर हार घालून व पेढे वाटून साजरी केली. यावेळी बिटरगाव पोलीस स्टेशन चे सेकंड ठाणेदार शिवाजी टिपूर्णे, बाळू पाटील चंद्रे, ओमा पाटील चंद्रे, साहेबराव वाघमोडे, रमेश गायकवाड ,गजानन सुरोशे,बालाजी पाचकोरे, प्रभाकर वाघमारे, संजय परतूडे दत्ता कांबळे, बालाजी परतूडे,पत्रकार करण भरणे, महेबूब शेख, अशोक गायकवाड आणि सर्व ढाणकी चर्मकार बांधव उपस्थित होते.