ताज्या घडामोडी

महागांव /अशोका कंपनिच्या विरोधात शेतकरी करणार आत्मदहन.

महागांव /अशोका कंपनिच्या विरोधात शेतकरी करणार आत्मदहन.

 

 

शेतामध्ये अतिक्रमण करुन उभे केले विद्युत खांब ; जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा शेतकर्‍याचा इशारा.

 

 

महागांव : अशोका कंपनी व महावितरणचे ३३ के.व्ही. विद्युत वाहिनिचे काम गुंज ते मुडाणा सुरु असुन सवना येथिल एका शेतकर्‍याच्या शेतामध्ये अशोका कंपनीने व महावितरणने शेतामध्ये बेकायदेशिरपणे अतिक्रमणकरुन विद्युत खांब उभे केले आहेत. सदर शेतकर्‍याने अशोका कंपनीला व महावितरणला वारंवार सागुन सुद्धा शेतामध्ये बेकायदेशिरपणे अतिक्रमणकरुन उभे केलेले विद्युत खांब काढले नसल्यामुळे शेतकरी हतबल होऊन आत्मदहन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यवतमाळ यांना दिला आहे. सदर शेतकर्‍यांच्या शेतामध्ये विनापरवाना अतिक्रमण करुन अशोका कंपनीचे पाच विद्युत खांब उभे केले आहेत व शेतातिल झाडांची कुर्‍हाड व कोयत्याच्या सहाय्याने कत्तल केली आहे. सदर शेतकर्‍याने या संदर्भात महावितरणला व अशोका कंपनीला वारंवार विनंती करुन सुद्धा विद्युत खांब कढण्यात आले नाही. त्यामुळे वैफल्याग्रस्त झालेल्या शेतकर्‍याने आत्मदहन करण्याचा ईशारा दिला आहे.

शेतकर्‍यांवर वारंवार अन्याय होत असुन अशोका कंपनीने बेकायदेशिरपणे अतिक्रमण करून विद्युत खांब उभे केले आहे. या शेतकर्‍याला न्याय न मिळाल्यास महावितरण व अशोका कंपनी जबबादार राहणार आहे.

 

पोलिसांच्या संमन्सला महावितरण व अशोका कंपनीने दाखवली केराची टोपली !

 

सवना येथिल शेतकर्‍यांच्या शेतामधिल विद्युत खांब १५ दिवसांच्या आत न काढल्यास तो शेतकरी अत्मदहन करणार असल्याने पोलिसांनी महावितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंता व अशोका कंपनीत काम करणार्‍या वरीष्ठ अभियंता अमोल सुने, सुपरवायझर दिनेश तिडके, ठेकेदार अतुल राठोड यांच्या नावाने कायदेशिर संमन्स काढण्यात आला होता. परंतू पोलिसांनी दिलेल्या संमन्सला महावितरण व अशोका कंपनीत काम करणार्‍या अभियंता, सुपरवायझर यांनी केराची टोपली दाखवली आहे व आपले म्हणने मांडले नसल्यामूळे अशोका कंपनीचा मनमानी कारभार आता चव्हाट्यावर आला आहे.

 

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी: लतिफ शेख

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *