उमरखेड : ढाणकी विज कंत्राटी कामगार झाला आक्रमक.
प्रतिनिधी,ढाणकी,मिलिंद चिकाटे
महावितरण मंडल यवतमाळ चे अधिक्षक अभियंता श्री.प्रवीण दरोलि साहेब यांनी विद्युत क्षेत्र तांत्रिक कंत्राटी का.यू. च्या विनंती ला मान देऊन दिनांक 22 जानेवारी 25 रोजी दुपारी 04 वाजता महावितरण मंडल कार्यालय यवतमाळ येथील कॉन्फरन्स हॉल मध्ये सर्कल मधील 04 ही विभाग मद्ये कार्यरत कंत्राटी कामगार यांचे अडीअडचणी जाणून घेणे व त्या सोडविणे करिता मीटिंग घेतली संघटने कडून राज्य अध्यक्ष संजय पडोळे यांनी सर्व मुलांची बाजू मांडून झाल्या नंतर खालील प्रश्नावर साहेबांचे लक्ष केंद्रित केले
1)कंत्राटी कामगार यांना (Esic) राज्य कर्मचारी विमा लागू आहे पण बरेच कंत्राटदार ती अपडेट करीत नाहीत परिणामतः esic चे योजना पासून कंत्राटी कामगार यांना मुकावे लागत आहे..त्या मद्ये कंत्राटी कामगार व कुटुंबातील पाच व्यक्ती यांना मोफत वैद्यकीय उपचार सेवा तसेच अपघात नंतर रजा, महिला कंत्राटी कामगारांना प्रस्तुती रजा /दुर्दैवाने एखाद्या कंत्राटी कामगाराची कामावर असताना अपघात होऊन निधन झाले तर त्यांच्या वारसांना कंत्राटी कामगार सध्या घेत होत्या मासिक वेतनाच्या 90 टक्के पेन्शन म्हणून लाभ मिळतो या सगळ्या योजना लाभ कंत्राटी कामगारांना घेण्यासाठी त्यांचे esic कार्ड अपडेट राहणे गरजेचे आहे तेव्हा सर्व कंत्राट दार यांना esicअपडेट करणे बाबतची सूचना द्यावी अशी संघटनेतर्फे विनंती केली,2023 मद्ये पुसद उपविभाग महागाव येथील कंत्राटी कामगार स्व.विठ्ठल आढाव यांचे वारसांना संघटनेच्या पाठपूरव्याने 16 हजार रुपये महिना पेन्शन लाभ सुरू झाला तसेच माहे ऑक्टोबर 2024 मध्ये आपल्या सर्कलमधील स्व.सुनील लोणे या पहारेकरी यांचे रोड अपघातात निधन झाले होते त्याची esic फाईल अपडेट करून दाखल करताना त्याचा पाठ पुरावा करताना ज्या अडचणी आल्यात तसेच उपविभाग ढानकी येथील कंत्राटी कामगार स्व.संतोष मूनेश्वर यांचे 2021 कोरोना आजाराने निधन झाले होते कंपनी परिपत्रक नुसार त्यांचे वारसांना 30 लाख रु. चा लाभ मिळून देणे करिता आलेल्या अडचणी बाबत साहेबांना अवगत केले व त्या अडचणी भविष्यात येऊ नये करिता राज्य अध्यक्ष संजय पडोळे यांनी विनंती सूचना केली संघटनेचे राज्य अध्यक्ष यांनी पाठ पुरावा करून न्याय मिळवून दिला व त्यामध्ये हे करत असताना कशा कशा अडचणी आल्या व कार्ड अपडेट राहणे का गरजेचे आहे याबद्दल माननीय अधीक्षक अभियंता यांना सांगितले आणि निश्चितच अधीक्षक अभियंता यांनी सर्व कंत्राटदार यांना ताबडतोब ती अंमलबजावणी करण्या करिता लेखी देतो असे आश्वासित केले सर्व कंत्राटी कामगारांना ड्रेस कोड /आय कार्ड व टी अँड पी सुद्धा लवकरच देण्यातील असे माननीय अधीक्षक अभियंता यांनी आश्वासित केले,वेळोवेळी सौर ऊर्जा व इतर काही कामे आहेत योजना आहेत त्यामध्ये कामदेऊ कोणालाही रिक्त ठेवल्या जाणार नाही असे सुद्धा माननीय अधीक्षक अभियंता साहेब यांनी आश्वासित केले,कंत्राटी वर कारवाई/ मारहाण झाल्यास आयपीसी 353 दाखल होत नाही त्यावर सुद्धा एक सूचना देण्याचे अधीक्षक अभियंता यांनी आश्वासन दिले, चर्चा मिटींगला यवतमाळ मंडल चे अधीक्षक अभियंता मा. प्रवीणजी दरोली साहेब वरिष्ठ व्यवस्थापक मानव संसाधन श्री.आंबेकर साहेब विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे राज्य अध्यक्ष संजयजी पडोळे केंद्रीय संघटक शेख इरफान शेखजी तसेच पूर्ण सर्कल मधून 70 कंत्राटी कामगार उपस्थित होते इतिहासात प्रथमच एका जिल्ह्याच्या अधीक्षक अभियंता साहेब यांनी कंत्राटी कामगारांना जवळ घेऊन समोरासमोर चर्चा केली,