सुसंस्कृत समाज हीच काळाची गरज :- डॉ.स्वाती मुनेश्वर
ढाणकी प्रतिनीधी: मिलिंद चिकाटे.
शासनाने निर्देशित सार्वजनिक आरोग्य विभाग व पोलीस विभाग १०० दिवसीय मोहिमेचे समन्वय साधत प्राथमिक आरोग्य केंद्र मुळावा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल मल्हारी दवणे ह्यांचे मार्गदर्शनात दिनांक २१ जानेवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र मुळावा येथे आरोग्य केंद्र मुळावा व पोलीस स्टेशन पोफाळी ह्यांचे संयुक्त विद्यमानाने प्रा.आ.कें.मुळावा येथे आयोजित महिलेचे लैंगिक शोषण / छळ / बलात्कार / विनयभंग / लहान मुलांवर होणारे शारीरिक अत्याचार/ शोषण ह्या अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषयावर ठाणेदार पंकज दाभाडे ह्यांनी कायदेसहित / उदाहरणसहित मार्गदर्शन केले..
नमूद विषयाची व त्या संबंधित कायद्याची समज असणे काळाची गरज आहे ह्या संकल्पनेतून शासनाच्या निर्देशांचे पालन करत सुयोग्य समन्वय साधत हा उपक्रम / कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र मुळावा येथे आयोजित करण्यात आला होता…या कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्र मुळावा व पोलीस स्टेशन पोफळी हद्दीतील सर्व आशा सेविका,अंगणवाडी सेविका,आरोग्य सेविका व आरोग्य विभागाच्या सर्व महिला अधिकारी ह्यांनी उपस्थिती दर्शवली.
यावेळी कार्यक्रमाला प्राथमिक आरोग्य केंद्र ढानकी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वाती मुनेश्वर दवणे,डॉ.संगीता रिट्ठे,ग्रामपंचायत पारडी सरपंच श्रीमती……………ह्या प्रमुख पाहुणे तर अध्यक्ष स्थानी मुळावा ग्रामपंचायत सरपंच श्रीमती शारदा जाधव होत्या.
उपस्थितांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलित करून व फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
श्री.बालाजी शिरडकर ह्यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ.विशाल दवणे ह्यांनी आभार व्यक्त केले,श्री.सुरज पराते,श्री.विनोद घुगे,श्री.ज्ञानदीप वानोळे,श्री.उल्हास भालेराव,श्रीमती.मंजू मुनेश्वर,रिना कोंढुरकर ह्यांनी परिश्रम घेतले.
“ केवळ कायदा असून सामाजिक प्रश्न सुटत नाहीत तर आपल्या कुटुंब स्तरावर येणाऱ्या पिढीला शिक्षणासोबत नीतिमूल्याची जोड देऊन सुसंस्कृत समाज उभारणे ही काळाची गरज आहे. ”
डॉ.स्वाती मिलिंद मुनेश्वर,वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र ढानकी