ढाणकी /बहिणी बदल चार चौघात अपशब्द बोलल्यामुळे केला चाकूने वार
प्रतिनिधी,ढाणकी
आपल्या बहिणी विषयी चार चौघात अपशब्द वापरल्या च्या रागात काल रात्री 9च्या सुमारास आरोपी पवन सुभाष याने प्रवीण माने या युवकाला चाकू मारून केले जखमी.
लिंबाजी कोंडबा माने जखमी चे वडील यांच्या माहिती नुसार दि. 17 रोजी रात्री 08/00 वा. चे सुमारास आरोपी बाभुळकर व त्यांचा मुलगा प्रवीण माने याची दोघांमध्ये शिवाजी चौक ढाणकी (जुने बसस्टॅन्ड) येथे दोघांमध्ये शिवीगाळ झाली त्यात आरोपी पवन बाभुळकर याच्या बहिणीबाबत अपशब्द वापरल्यामुळे वाद झाला. रात्रीचे 09/00 वा.चे सुमारास त्यांचा मुलगा प्रविण लिंबाजी माने घरी जेवण करत असताना पवन सुभाष बाभुळकर हा इंदिरा गांधी चौक आखर ढाणकी येथील त्यांच्या घरात येऊन माझ्या बहिणीबद्दल अपशब्द का बोलला असे विचारून लगेच पवन बाभुळकर याने कमरेला लपवुन आणलेला लोखंडी चाकु काढुन वार केला असता तो चाकु त्याच्या कंबरेवर पाठीच्या मनक्याजवळ लागल्याने गंभीर जखमी झाला. कमरेतुन भरपुर रक्त निघत असल्याचे पाहुन तो तेथुन निघुन गेला. तेंव्हा तेथे असलेल्या नागरिकांनी जखमी प्रवीण माने याला प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन आले त्याठिकाणी प्राथमिक उपचार करून उमरखेड येथे रेफर करण्यात आले मात्र पवन बाभुळकर याने मारलेला चाकू चा वार प्रवीण मानेच्या खोलवर गेल्याने त्याला नांदेड येथे रवाना केले.
जखमी प्रवीण मानेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारी वरून आरोपी पवन बाभुळकर याला रात्रीच अटक करण्यात आली असून याच्यावर भारतीय न्याय संहिता 109 { 1} 333, 351,(2)(3)व भान्यासं सहकलम 4.25 आर्म अक्ट अंतर्गत कार्यवाही करण्यात आली पुढील तपास ठाणेदार संतोष मनवर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शिवाजी टिपूर्णे बिट जमादार रोशन सरनाईक करत आहेत,