उमरखेड आगाराचा गलथान कारभार पास धारकांना करावी लागते पायपीट
ढाणकी प्रतिनिधी, मिलिंद चिकाटे
उमरखेड हिमायतनगर ढाणकी मार्ग गांजेगाव पळसपुर शेड्युल क्र.41,42 ची नियोजीत फेरी उमरखेड वरुन सुटणारी फेरी 16.वाजताची फेरी तब्बल उमरखेड आगारातुन 18.55 वाजता मार्गस्थ झाली परंतु आसे समजते की,मंहामळाच्या सोयीनुसार बस फेरी हिमायतनगर न जाता ढाणकी वरुन उमरखेडला परत गेली!यामुळे गांजेगाव पळसपुर डोल्हारी शिरपुली च्या पासधारक शाळकरी विद्यार्थिनी व विद्यार्थी त्यांना औवध वाहतुकीतुकीने जावे लागले.ढाणकी गांजेगाव पळसपुर डोल्हारी एकुण मूल व मुली 65, जणांना आहील्याबाई होळकर पास दिल्या आहेत असे समजते.पण उमरखेड आगाराची दररोज फेरी उशीर जात असल्यामुळे त्यांना याचा लाभ घेता येत नाही आहे. याबद्दल वरीष्ठाकडे तक्रार करुन सुद्धा वेळेवर फेरी पाठवत नसल्याने सायंकाळ चा वेळ असल्यामुळे विद्यार्थी व विदयार्थ्यांना अवैध वाहतूक ने प्रवास करावा लागत असल्याने काही आनुचीत प्रकार घडला!तर याला जिम्मेदार कोण राहील?. उमरखेड आगाराचा गलथान कारभारामुळे प्रवाशी त्रस्त झाले असून सहाय्यक वाहतुक अधिक्षक जगदीश मनवर ,वाहतुक निरीक्षक चेतन जाधव यांनाच जबाबदार धरावे लागेल?त्यांना दूरध्वनीवर संपर्क साधत असल्यामुळे त्यांनी समाजसेवकांचे फोन ब्लॅक लिस्ट मध्ये टाकत आहे.मध्यवर्ती कार्याच्या आदेशानुसार प्रत्येक बसेस आगारातील प्रमुख अधिकारी बसेस मध्ये त्यांचे दुरध्वनी क्रमांक लावणे आणेवारी असून तसेच प्रवाशाने फोन केल्यावर तात्काळ तक्रारीचे निवारण गरजचे आहे. आपल्याकडे बसेस कमी असल्याने प्रासंगिक करार देणे बंधनकारक नाही पण आपला स्वतःचा मोठेपणा वाढवण्यासाठीदि13/01/2025 रोजी चार बसेस शैक्षणिक सहल दिल्याचे समजते ते चार बसेस आगारात दिल्या नसत्या तर आगारातील फेऱ्या वेळेवर जात शेड्युल रद्द होत नव्हते या जबाबदार आगार व्यवस्थापक आहे. याची चौकशी करून जे कोणी दोषी आहे त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करावी. याकडे आगार व्यवस्थापक जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे महामंडळाची प्रतिमा मलीन होत असून आर्थीक फटका बसत आहे. प्रवाशी अश्या कारभारामुळे त्रस्त झाल्यामुळे एसटी महामंडळ ची वाट न बघता अवैध वाहतूक ने प्रवास करत आहे.या मुळे एसटी महामंडळ खोल खड्ड्यात जात आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी बहुजन हिताय बहुजन सुखाय या बिद्र वाक्याची अशी तैशी होऊ आहे.ग्रामीण भागातील फेऱ्या वेळेवर दररोज रद्द होत आहे याला जिम्मेदार येथील स्थानिक अधिकारी कर्मचारी आहेत .उमरखेड ढाणकी हिमायतनगर रस्त्यावर सध्या दोनच फेऱ्या आहेत उमरखेड वरुन सकाळी 7.30 वाजता फेरी व सायंकाळी 16 वाजताची या दोन फेऱ्या आहे या मार्गवर सात फेऱ्या राहायच्या पण या आगार व्यवस्थापकानी केवळ दोन फेऱ्या वर आणून सोडले आहे.एसटी महामंडळ प्रवाशांवर उपकार करते की काय !असे आता प्रवाशांना वाटत आहे.
महाराष्ट्र राज्यापरिवहन महामंडळाचे घटने प्रमाणे बहुजन हिताय बहुजन सुखाय प्रवाशांच्या हितासाठी प्रवाशी हा केंद्र बिंदु माणुन त्याची रंजल्या गाजल्या ची एक गरीबांचा रथ म्हणून उदयास आलेली संकल्प पणा महाराष्ट्र सरकार राबवीत आहे.शासनाच्या विविध सवलती त्या प्रमाणे आमच्या उमरखेड आगारात मध्यवर्ती केंद्र ढाणकी आहे.या अश्या निष्क्रिय आगार व्यवस्थापक किनाके यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करावी. त्यांनी आज दि.13/1/2025रोजी ढाणकी हिमायतनगर फेरी रद्द केली त्यामुळे विद्यार्थी विद्यार्थिनी पासेस धारक यांना मानसीक त्रास झाले आहे.याला जिम्मेदार आगार व्यवस्थापक उमरखेड आहे . असून यांची चौकशी करून कडक कार्यवाही करावी.
हिरासिंह चव्हाण,
सचिव माधवराव मिटकरे प्रवाशी मंडळ ढाणकी.
चौकशीवर फोन केला सांगितले जाते डेपोतुनच आली उडवाउडवीची उत्तरे दिली जातात उमरखेड आगाराच्या दादागिरी वाढली आहे प्रवाशासोब सौजन्य वागणुक देत नाही आसे कामचुकार अधिकाऱ्यांवर निलंबित करुन सदर प्रकरण चौकशी करावी
नाथा पाटील
कार्याध्यक्ष मा.मि.प्रा. मं.ढाणकी