अध्यक्ष पदी शे. इरफान शे. गुलाब, उपाध्यक्ष करण भरणे तर सचिव पदी अशोक गायकवाड.
ढाणकी प्रतिनिधी : मिलिंद चिकाटे
बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील पहिले पत्रकार आहेत ज्यांनी ‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्रातून देशात मराठी पत्रकारितेचे युग सुरू केले. बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केलेल्या ‘दर्पण’मुळे मराठी पत्रकारितेचा इतिहास घडला. त्यांच्या स्मृतींना वंदन म्हणून हा दिवस ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या योगदानाचा आदर करण्यासाठी, दिनांक 6जानेवारी 2025 रोजी गणेश कचकलवार राष्ट्रीय अध्यक्ष आदेशानुसार व संजय भोसले उप जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात युवा ग्रामीण पत्रकार ढाणकी संघटनेची नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. संजय भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत 2025 या वर्षाकरिता शे. इरफान शे. गुलाब यांची अध्यक्षपदी आणि करण भरणे उपाध्यक्ष तर अशोक गायकवाड यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली.
उर्वरित कार्यकारिणीत सहसचिवपदी प्रशांत अरेवाड, संघटक बंटी फुलकोंडवार,
सल्लागार मिलिंद चिकाटे तर प्रसिद्धी प्रमुख पदी शे इरफान शेखजी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्यकारिणीतील सदस्यांमध्ये शेख महेबूब शेख सुलेमान व अजिज खान आदींचा समावेश आहे.
कार्यकारिणी गठित झाल्यानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करत वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या.