ढाणकी येथे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसाचे रूट पतसंचलन तयनात.
ढाणकी प्रतिनिधी / मिलिंद चिकाटे
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी बिटरगाव पोलीस स्टेशन च्या वतीने ढाणकी नगरीत उपविभागीय पोलीस अधिकारी हणुमंत गायकवाड यांच्या उपस्थित रूट मार्च दि 28 ऑक्टोम्बर रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला
ढाणकी नगरी चा बाजार दिवस असल्याने गावखेड्यातील मतदार बंधू भगिनी खरेदी करण्यास येतात त्यांना मोकळ्या वातावरणात निर्भीड पणे मतदान करता यावे म्हणून बिटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार संतोष मनवर यांनी मेन लाईन छत्रपती शिवाजी महाराज चौक नवीन बास्टन्ड या ठिकाणी मतदार यांना जागृत करत मतदान करण्यास प्रोसाहित केले
ढाणकी नगरीतील मिरवणूक मार्गाने आपला पोलीस बंदोबस्त व BSF व RCP चे जवानाच्या तुकड्या व पोलिस स्टेशन बिटरगाव येथील अधिकारी अंमलदार घेऊन यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे मतदार यांना निर्भीड पणे मनात कोणत्याही प्रकरची भीती न बाळगतात मतदान करण्यात यावे असे आव्हान करण्यात आले काही अडचण निर्माण झाल्यास आम्हाला फोन वरून संपर्क करण्याचे अव्हन ठाणेदार संतोष मनवर यांनी केले
पोलीस बांधवांचा अचानक पणे आलेला समूह बघण्या करीता नागरिक मोठ्या संख्येने चौका चौकात जमले होत