यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर
महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय शिक्षक सन्मान पुरस्कार महागाव तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागात वसलेल्या कोनदरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील कार्यरत सहाय्यक शिक्षकांस नुकतेच डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेत सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कोनदरी येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राहुल शेषराव लंबे हे सहाय्यक शिक्षक म्हणून गेल्या 14 वर्षांपासून सातत्याने ज्ञानार्जन कार्य पार पाडत आहेत. पाच जुलै 2011 रोजी त्यांची येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये नियुक्ती झाली. सतत चौदा वर्षे अतिशय डोंगराळ भागात वसलेल्या वाकान- कोनदरी सारख्या ग्रामीण भागात त्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडीत चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे दिले. या ठिकाणी इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत वर्ग असून विद्यार्थी संख्याही मोठी असुन मुख्याध्यापकासह पाच शिक्षक या शाळेत कार्यरत आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांनी उत्कृष्ट पद्धतीनेअध्यापन केले. शाळेला लागणाऱ्या शैक्षणिक साहित्याची निर्मिती करण्यामध्ये लंबे सरांचा उत्कृष्ट सहभाग राहिला आहे. श्री. लंबे सरांनी येथील जिल्हा परिषद शाळेमधील शालेय ऑनलाईन कामकाजात पारदर्शकता ठेवली आहे. गावातील शालेय शिक्षण समितीच्या माध्यमातून संवाद साधत, शाळेला नवीन इमारत बांधकामासाठी प्रोत्साहित करीत या ठिकाणी सुसज्ज अशी इमारत निर्मिती करवून घेत गावाच्या सौंदर्यात भर पडली आहे. शाळेमध्ये शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण केली. विद्यार्थी पटसंख्या वाढवण्यात सर्व शिक्षकांनी मोठा प्रयत्न केला. 2023- 24 मध्ये अध्यापन प्रक्रियेचे व्यवस्थापन व मूल्यमापन विभागीय स्तरीय मास्टर ट्रेनर मध्ये सहभाग नोंदविला. त्यांनी उपक्रमशिल शिक्षक म्हणून कार्य करीत अनेक विद्यार्थ्यांना विद्यादानाचे प्रभावीपणे धडे देण्याचे कार्य पार पाडले. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत शारीरिक श्रम, कबड्डी, खो-खो अशा खेळाची प्रोत्साहित करीत आवड निर्माण केली. सामाजिक परिवर्तन व राष्ट्र उभारणीच्या उद्देशाने समाजातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचविण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रमाणिक, अथक प्रयत्ना बद्दल त्यांना ” महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने ” गौरविण्यात आले. सदर पुरस्कार मराठा सेवा संघ जालना या ठिकाणी मा. खा. भाऊसाहेब देशमुख सभागृहात 20 ऑक्टोबर 2024 रोजी डॉ. पंजाबराव देशमुख ‘महात्मा ज्योतिराव फुले राष्ट्रीय शिक्षक परिषद’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.