ढाणकी शहरामध्ये स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रुपयांचे बिल ब्राह्मणे मल्टिसर्विसेस उकळत आहे?
ढाणकी प्रतिनिधि:
ढाणकी शहरामध्ये किती रस्ते, नाली व गटारी सफाई होते?किती टन कचरा निघतो व कोणत्या काट्यावर मोजला जातो याची दैनंदिन माहिती नगरपंचायत असायला पाहिजे पण असे दिसत नाही. घनकचरा मोजण्यासाठी प्लेट काटा नाही. मोजमापाच्या पावत्या नाहीत मंग घनकचरा बिल कोणत्या आधारावर दिले जाते ? ठेकेदारकडे अपुरा सफाई कर्मचारी वर्ग असतांना, त्यांना सुरक्षित किट सुद्धा दिलेली दिसत नाही.गावातील १७ वार्डातील ४० हजार लोकवस्तीच्या गटारी व रस्त्यांची स्वच्छता होते तरी कशी हा मोठा संशोधनाचा विषय आहे.
दैनंदिन सफाई होते की नाही हे बगन्यासाठी कोणताही अधिकारी नेमलेला दिसत नाही? मुख्य रस्त्यांची सफाई साठी ढाणकी नगरपंचायतमध्ये कायमस्वरूपी महिला सफाई कर्मचारी असून महिला कर्मचारी शासकीय अन्नधान्य गोडाउन परिसर आणि रस्त्यावर सफाई करण्यामधी कामचुकारपणा करताना दिसत आहे. महिला सफाई कर्मचारी यांना कचरा असल्या ठिकाणी चे सफाई करण्यासाठी सांगितले असता सफाई करण्यासाठी दुर्लक्ष करत ते पुढे निघून जाण्याची तक्रारी व्यापारी दुकानदार करताना दिसत आहे ,
दैनंदिन स्वच्छतेचा ठेका ब्राह्मणे मल्टिसर्विसेस याला देण्यात आला असून स्वच्छतेच्या नावाखाली ही कंपनी महिन्याकाठी लाखो रुपयांचे बिल नगरपंचायत तिजोरीतून उकळत असल्याचे नागरिकातून बोलल्या जात आहे .
पदाधिकारी यांना स्वच्छतेचा ठेका घेतलेली ब्राह्मणे मल्टिसर्विसेस कंपनी दैनंदिन स्वच्छता करीत आहे की नाही हे न पाहताच बिले कसे काय अदा करत असल्याचे सुद्धा नागरिकात चर्चा आहे.