ढाणकी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध धम्म आषाढ चे रोज वाचन.
ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकाटे

ढाणकी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बुद्ध विहार येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आषाढ पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा या तीन महिन्या दरम्यान रोज सायंकाळी आठ वाजता वाचन करण्यात येत होते. ग्रंथवाचन उपासक प्रकाश पाईकराव यांनी केले. याप्रसंगी भीम घडला असा हा पुस्तकाच्या लेखिका पल्लवी प्रकाश यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाल्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे जसे वाचन करतो आणि भगवान बुद्धाची शिकवण अंगी करतो त्याचप्रमाणे प्रत्येक उपासक/ उपासिका यांनी भारतीय संविधान वाचून त्यातील प्रत्येक कलमाचा अर्थ समजून घ्यावा आणि आपल्या वैयक्तिक जीवनात उपयोग करावा आणि त्याच दरम्यान भीम घडला असा या बाल कादंबरीचे वाटप करण्यात आले. त्रिशरण व अष्टशील ग्रहण करून उपासक प्रकाश पाईकराव व रेखा प्रकाश पाईकराव सपत्नी यांना शाल व शुभ्र वस्त्र तसेच संध्या विश्वनाथ विनकरे यांना देखील शुभ्र वस्त्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित लताबाई राऊत विमल कैलास कुलदीपके निकिता बुद्धभूषण पाईकराव लता रमेश गायकवाड पद्मिनी बाई गायकवाड सागर गायकवाड जिजाबाई मुनेश्वर अध्यक्ष सावित्रीबाई फुले महिला मंडळ शांताबाई हरी गायकवाड, स्वाती वैद्य, निर्मला गायकवाड, छायाबाई राऊत, सयाबाई गायकवाड, संगीता घोगरे ,सूत्रसंचालन सीमा ताई गायकवाड, व खिर दान करून आभार प्रदर्शन प्रकाश पाईकराव यांनी केले



