राजकारण

मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा इच्छुक उमेदवारांसोबत संवाद बैठक संपन्न.

मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा इच्छुक उमेदवारांसोबत संवाद बैठक संपन्न.

महाराष्ट्र चीफ एस.के. चांद यांची रिपोट.

 

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज महाराष्ट्रातील संपूर्ण इच्छुक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात आलेले होते.

या अंतर्गत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इच्छुक उमेदवारांची मांदियाळी आज दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रोजी अंतरवाली सराटी येथे बघावयास मिळाली.

 

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी इच्छुक उमेदवारांची संवाद बैठक घेऊन चर्चा केली.

मागील काळात फडणवीस सरकारला मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये ठोस निर्णय घेण्यासाठी मनोज जरंगे पाटील यांनी अवधी दिला होता,परंतु त्या अवधीमध्ये सरकारने कुठलाही ठोस निर्णय न घेतल्यामुळे आम्ही येणाऱ्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडनुकांमध्ये उमेदवार उभे करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेणार आहोत आणि मराठा समाजाला विचारून लढू किंवा पाडू हा निर्णय आम्ही लवकरच घोषित करणार आहोत.

अशी माहिती त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

 

उमरखेड तालुक्यातून सुद्धा अनेक इच्छुक उमेदवार यावेळी अंतरवाली सराटी येथे गेलेले बघायला मिळाले.

ज्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते इंजि. विद्वान भाऊ केवटे यांनी सुद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांची भेट घेतलेली बघायला मिळाली.

 

About The Author