महागांव/मातोश्री शाळेने केलेले अतिक्रमण कधी निघणार.

वादग्रस्त मातोश्री शाळेच्या विरोधात
मूळ मालक
प्रफुल साहेबराव नरवाडे यांची जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार
यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर
विद्यार्थी विकास सेवा समिती पुसद व्दारा संचालित मातोश्री शिक्षण संस्था ने शासनाने आरक्षित केलेल्या ओपनस्पेस १००६३ जागेमध्ये अधिका-यांची साठेलोटे कऊन व बेकायदेशीर ठराव घेवुन शासनाची दिशाभुल करून शासनाच्या ओपनपेसवर बेकायदेशीर जागेवर केलेले अतिक्रमण काढून शासनाने शासनाच्या ताब्यात घ्यावे.
अशी तक्रार दिनांक 8/10 24 ला करण्यात आली
व या शाळेवर प्रशासन नेमून पालकावर होणारा अन्याय थांबवावा
संबंधीत संस्था बांधकाम होण्यापुर्वी संस्थेची जागा नसतांना तसेच अनाधिकृतं संस्थेने शासनाच्या खुल्या जागेत बांधकाम केले असतांनाही शाळा मान्यता देण्यापुर्वी शाळा पाहणी करण्यासाठी आलेल्या अधिकारी वर्गाने संस्था चालकाशी साठेलोठे करून शासनाची खुली जागा संस्था चालकाच्या खिशात घातली व नियम धाब्यावर ठेवुन संस्थेस मान्यता देण् यात आली. तसेच सन २००९ आर.टी. अॅक्ट नुसार विद्यार्थ्याकडून निशुल्क घेता येत नाही. मग ही संस्था विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी नसुन फक्त शिक्षणाचा व्यवसाय करत आहे. प्रत्येकी वार्षीक २०,०००/- रूपये शुल्क आकारून विद्यार्थ्याकडून वसुल केली जाते.
तेंव्हा अनाधिकृत शासनाची फसवणुक करून ही संस्था अनुदान लोटण्याचे
काम करत आहे. एवढेच नव्हे तर सदर शाळेची ईमारत दोन प्लॉट मध्ये उभारल्या गेली आहे तेंव्हा सदर संस्था चालकाने एक प्लॉट स्वतःच्या नावाने व दुसरा प्लॉट सामाईक करून घेतला आहे. १००/१२ व १००/१३ असे दोन प्लॉट त्यापैकी १००/१२ ह्या कर्ज ७/१२ वर महागांव येथील एका विशिष्ट बँकेला ४०.०० लाख रूपये गहाण, ठेवण्यात आलेला आहे
व १००/१३ हे सामाईक करण्यात आला आहे. तेंव्हा ही शासनाची शुध्द फसवणुक सदर संस्था चालकाने केली असल्याचा आरोप प्रफुल साहेबराव नरवाडे यांनी केला आहे
तेंव्हा वरील संस्थेच्या मान्य ते बाबतचे सर्व दस्त ऐवज तपासुन तात्काळ शासनाची तसेच सामान्य जनतेची फसवणूक थांबवावी. व योग्यती कार्यवाही करण्यात यावे अशीही लेखी तक्रार सादर करण्यात आली आहे




