उमरखेड / तालुक्यातील आरोग्य केंद्र थेरडी ( वन ) येथील डॉ. खान यांची जागलं उठवा.
उमरखेड / वसंता नरवाडे यांची बातमी
रुग्णाची हेळसांड करून मानसिक त्रास देणाऱ्या मुख्य डॉ. खान यांची तात्काळ बदली करा गाडी, बोरी, थेरडी येथील नागरिकांनी दिली आरोळी.
उमरखेड तालुक्यातील अतिदुर्गम बंदी भागातील थेरडी या गावांमध्ये आरोग्य केंद्र आहे. ग्रामीण बंदी भागातील लोकांना वेळेवर सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या म्हणून या भागामध्ये शासनाने आरोग्य केंद्र उभारले आहे. आज पर्यंत ग्रामीण बंदी भागातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाल्या. परंतु पी. एस. सी. थेरडी येथे डॉ. खान साहेब रुजू झाल्या पासून हम.. करे.. सो कायदा अर्थात हुकूमशाही पद्धतीने रुग्णांची हेळसांड करून नागरिकांना मानसिक त्रास देत आहेत.
त्या कारणाने दि.7 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10 ते 10:30 च्या दरम्यान गाडी, बोरी, थेरडी येथील काही प्रतिष्ठित नागरिक डॉ खान साहेबांना विनंती करण्यासाठी आरोग्य केंद्र येथे गेले होते. परंतु डॉक्टर साहेब उमरखेड येथे मिटिंग साठी गेले आहेत. असे उपस्थित असलेले समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश निलंगे यांनी सांगितले.
या आरोग्य केंद्रात सद्या 9 कर्मचारी कार्यरथ आहेत त्या पैकि येक मेडिकल ऑफिसर डॉ. स. भा खान हे डॉकर साहेबांची मुलगी आहे असे ही सांगण्यात आले होते.
9 कर्मचाऱ्या पैकी फक्त 4 कर्मचारी मुख्यालय येथे हजर राहतात व बाकी शहरातून जाणे येणे करतात अशी माहिती सांगण्यात आली. रात्री अपरात्री रुग्ण आरोग्य केंद्रात गेले असता डॉ. खान साहेब स्पष्ट सांगतात माझ्या दवाखान्यात कोणत्याही सुविधा नाहीत तुम्ही पेशंट ला प्रायव्हेट दवाखान्यामध्ये घेऊन जा.
एका शेतकरी महिलेला कुत्रा चावला म्हणून दवाखान्यात गेली असता डॉ. खान साहेबांनी त्यांना तुम्हाला ज्या कुत्र्यांनी चावा घेतला तो कुत्रा माझ्याकडे घेऊन या तरच मी विलाज करेल अन्यथा माझ्याकडून कोणतीही अपेक्षा करू नये असे बोलून त्या शेतकरी महिलेचा इलाज केला नाही. दि,6 ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजताच्या दरम्यान एका गरोदर मातेला डिलेवरी साठी आरोग्य केंद्रात आणले होते. मात्र डॉ. खान साहेबांनी गरोदर महिलाची थातुर मुतुर तपासणी करून पोटात असलेल्या बाळाचे ठोके बंद पडले आहेत म्हणून प्रस्तुतीसाठी प्रायव्हेट दवाखान्यात घेऊन जा म्हटले होते. त्यावेळेस गरोदर महिलांना किनवट येथे घेऊन जात असताना रस्त्यानेच 10 मिनिटांनी बाळाला जन्म दिला कोणतीही या वेळेस दुर्घटना झाली नाही. या कारणावरून संतप्त नागरिक डॉ खान विषयी रोष व्यक्त करीत होते.
डॉ. खान साहेबांनी मानव विकास योजना चा आलेल्या निधीचा लाभ कोणालाच मिळू दिला नाही.
ज्या गरोदर महिलांना आरोग्य केंद्राकडून निधी मिळतो अद्यापही महिलांना मिळाला नाही.
डॉ. खान साहेबांनां नागरिक विनंती करण्या करिता किंवा समजून सांगण्यासाठी जातात. तेंव्हा डॉ. खान साहेब म्हणतात मी अधिकारी आहे. मला बंदी भागातील जंगली, अनपढ, गाफिल, लोकांनी शहाणपणा शिकवू नये… जर मला कोणी सांगण्याचा प्रयत्न केला तर 353 चा गुन्हा दाखल करून तुम्हाला तुरुंगात डांबतो. असे बोलून डॉक्टर साहेब गरीब नागरिकांना धमक्या देऊन मनमानी करतात. त्यामुळे गाडी, बोरी, थेरडी येथील नागरिक डॉ. खान साहेबांच्या दंडेलशाही कारभाराला कंटाळून गेले आहेत. येत्या काही दिवसात संपूर्ण गावकरी डॉ खान साहेबांची बदली करून आम्हाला कर्तव्यदक्ष डॉक्टर द्यावा अशी लेखी तक्रार देणार व संबंधित विभागाने आमच्या तक्रारीचे निराकरण नाही केल्यास. आम्ही काही गावकरी संविधानिक पद्धतीने उपोषण करणार असे बोलत होते.