उमरखेड / अवैद्य दारू विक्री विरोधात टाकळी(राजापूरवाडी) वासियांचे घोषित उपोषण स्थगित!
गेल्या काही वर्षांपासून टाकळी (राजापूरवाडी) या गावामध्ये अवैद्य दारू विक्रीचा सुळसुळाट झालेला होता.या विरोधात गावातील ग्रामस्थांनी तसेच महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासकीय कार्यालयांच्या चकरा मारून अवैद्य दारू विक्री विरोधात आवाज उठवलेला होता.
परंतु प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नसलेली पाहून काही दिवसांपूर्वी येथील ग्रामस्थांनी पोलीस स्टेशन उमरखेड येथे आज दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी आमरण उपोषणास बसण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता.

परंतु आज टाकळी या गावामध्ये उमरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय सोळंके साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत साहेब,बीड जमादार चाटे साहेब,यांनी उपस्थित राहून सदर अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्ती विरोधात योग्य ती कार्यवाही करून येथील ग्रामस्थांना लेखी आश्वासन देऊन अश्वस्त केले यावेळी समोपचार आणि संवादासाठी सामाजिक कार्यकर्ते
भारतीय युवा मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव विद्वान केवटे हे उपस्थित होते.

यावेळी गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक तंटामुक्ती अध्यक्ष सर्व सदस्य तथा नागरिक व महिला आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होता.
यावेळी उपसरपंच जाधव यांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनामुळे आम्ही आमचे आंदोलन तूर्ता स्थगित करत आहोत अशी माहिती माध्यमांशी बोलताना दिली.





