महागांव / बोगस खते उत्पादन करणाऱ्या कारखानदार व विक्री करणाऱ्या कृषि केंद्र चालकांवर फौजदारी कारवाई करा.
(जनआंदोलन समितीचे जगदीश नरवाडे यांची खा.नागेश पाटील यांच्याकडे मागणी)
एस. के. चांद यांची रिपोट.
महागाव निकृष्ठ व बोगस दर्जाचे भुमी उत्पादक खत पुसद एम.आय.डी.सी. कारखान्यात तयार होवून महागांव तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने त्या उत्पादक व विक्रेत्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी विदर्भ जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी खा.नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडे केली आहे.

महागांव तालुक्यातील काही दुकानदाराकडून बोगस खत विक्री होत असल्याचे तक्रार दि. २५ जुलै २०२४ रोजी जिल्हा कृषी अधिकारी यांना केली त्यावरुन त्या बोगस खताचा नमुना घेतला. परंतु बोगस खते निर्माण करणाऱ्या मुळ कंपनी मालकावर कोणतीही कार्यवाही केली नाही. महागांव येथे कार्यवाही झाल्यानंतर दोन दिवसानंतर रात्री पुसद एम.आय.डी.सी येथे तपासणी करीता कारखान्यामध्ये गेले असता त्याठिकाणी १ किलोही खत मिळाले नाही. व कुणा-कुणाला विक्री केले त्याचे नांव जाहिर करण्यात आले नाही व त्यावर कार्यवाही केली नाही. त्यामुळे जिल्हा कृषि विभागावर कार्यवाही केली नसल्यामुळे बोगस खते विक्रीला कृषि विभागाचा आशीर्वाद असल्यामुळेच हा प्रकार घडत असल्याची शंका उपस्थित झालेली आहे. जिल्हा कृषि अधिकारी यांनी तात्काळ बोगस खत उत्पादक व सर्व विक्रेत्या विरुध्द फौजदारी कार्यवाही करुन हजारो शेतकऱ्यांना न्याय द्यावा व शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई देण्यात यावी करीता आपण आवाज उठवावा अशी मागणी विदर्भ जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी खा.नागेश पाटील यांच्याकडे केली आहे. यावेळी जगदीश नरवाडे संस्थापक अध्यक्ष जन आंदोलन आधार संघर्ष समिती गोविंदराव देशमुख शिवाजीराव देशमुख सौ संध्या रणवीर दादाराव ठाकरे तात्या शिंदे विजय सुर्यवंशी संदीप ठाकरे विभागीय अधिकारी मुळे साहेब तहसीलदार राने साहेब नायब तहसीलदार राठोड साहेब बीडिओ टाकरस साहेब ठाणेदार सह सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते पोटॅश खत म्हणून रांगोळ गेजगी रेतीला लालसर कलर लाऊन पोत्यात भरली आहे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या कृपेने ही शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे जोपर्यंत उत्पादक व सर्व विक्रेत्यावर पोलीस एफ आय आर होणार नाही तोपर्यंत आंदोलन यापुढे उग्र स्वरूपाचे सुरू राहील जगदीश नरवडे संस्थापक अध्यक्ष जन आंदोलन आधार संघर्ष समिती



